लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : भारतीय रेल्वेच्या विविध विभागांमध्ये ब्लॉक घेऊन पायाभूत विकास कामे करण्यात येत आहेत. पुढील आठवड्यात कोकण रेल्वेवर दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वे मार्ग व इतर पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात कोकण रेल्वेवरील पाच रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार असून त्यामुळे प्रवाशांना प्रवासासाठी अधिक वेळ लागणार आहे.

कोकण रेल्वेवरील कडवाई – रत्नागिरीदरम्यान १० ऑक्टोबर रोजी सकाळी ७.४० ते सकाळी १०.४० या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी गाडी क्रमांक १९५७७ तिरुनवेल – जामनगर रेल्वेगाडी ठोकूर – रत्नागिरीदरम्यान तीन तास थांबवण्यात येणार आहे. गाडी क्रमांक १६३४६ तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य तिलक (टी) नेत्रावती एक्स्प्रेस ठोकूर – रत्नागिरीदरम्यान १.३० तास थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १२०५१ मुंबई सीएसएमटी ते मडगावदरम्यान धावणारी जनशताब्दी एक्स्प्रेस खेड – चिपळूणदरम्यान २० मिनिटे थांबवण्यात येणार आहे.

आणखी वाचा-“मी गोल्डी ब्रार बोलतोय, पुढच्या दोन दिवसांत…”, मुंबईतील काँग्रेस आमदाराला जीवे मारण्याची धमकी

१२ ऑक्टोबर रोजी मडगाव – कुमटादरम्यान सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे गाडी क्रमांक ०६६०२ मंगळुरू सेंट्रल – मडगाव रेल्वेगाडी मंगळुरू – कुमटा दरम्यान धावेल. तर कुमटा – मडगावदरम्यान ही गाडी रद्द करण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०६६०१ ही मडगाव – मंगळूरदरम्यान विशेष गाडी कुमटा – मंगळुरू म्हणून धावेल, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Megablock on konkan railway schedule changes for five trains mumbai print news mrj
First published on: 08-10-2023 at 16:08 IST