विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील माटुंगा-मुलुंड दोन्ही जलद मार्ग, तसेच पनवेल-वाशी दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरील सांताक्रुझ स्थानकाजवळ सिग्नलसह अन्य तांत्रिक कामांसाठी शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून यामुळे लोकलच्या वेळापत्रकावरही काहीसा परिणाम होणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड दोन्ही जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लाॅक असेल. सीएसएमटी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल माटुंगा आणि मुलुंड दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर ठाणे येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत मुलुंड आणि माटुंग्यादरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या मार्गावरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावतील. हार्बर मार्गावरही पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत मेगाब्लाॅक आहे. पनवेल, बेलापूर येथून सीएसएमटी, गोरेगावकडे जाणाऱ्या लोकल आणि सीएसएमटी येथून पनवेल, बेलापूरकडे जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर ट्रान्स हार्बरवरील सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत पनवेल येथून ठाण्याला जाणाऱ्या, तसेच सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान ठाणे येथून पनवेला जाणाऱ्या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. तर ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यानही लोकल सेवा उपलब्ध असेल. बेलापूर, नेरुळ- खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे वेळापत्रकानुसार धावतील.

Block. Konkan Railway, trains,
कोकण रेल्वेवर ब्लॉक; रेल्वेगाड्यांचा खोळंबा
Mega block on Sunday on Western Railway
मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
सागरी किनारा मार्गावर ‘बेस्ट’ची प्रतीक्षाच; स्वतंत्र मार्गिका राखीव असताना अद्याप नियोजन नाही

पश्चिम रेल्वेवर तांत्रिक कामांसाठी सांताक्रुझ स्थानकाजवळ दोन्ही धीम्या मार्गांवर शनिवार, १४ जानेवारी रोजी रात्री १० ते रविवार, १५ जानेवारी रोजी पहाटे ४ पर्यंत आणि दोन्ही जलद मार्गावर मध्यरात्री १२.३५ ते रविवारी पहाटे ४.३५ वाजेपर्यंत, तसेच पाचव्या मार्गावर रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ब्लाॅक असणार आहे. वांद्रे – अंधेरीदरम्यान डाऊन धीम्या लोकल या दोन स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरून धावतील. तर काही चर्चगेट-बोरीवली लोकल या गोरेगावपर्यंतच धावणार आहेत. तर चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल वांद्रे-अंधेरी दरम्यान हार्बर मार्गावरून धावतील. अप धीम्या मार्गावरील काही लोकल अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेन्ट्रल मार्गावर जलद म्हणूनही धावतील. काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.