मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर आणि अभियांत्रिकी कामांसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर रविवार ब्लॉक घेण्यात येईल.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

कुठे : विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कधी : सकाळी ८ ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत अप मार्गावरील मेल/एक्सप्रेस ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. एलटीटीकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.

हेही वाचा – कुलाबा येथे महिलेचा विनयभंग

हार्बर मार्ग

कुठे : पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्गिका वगळून) अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधी सीएसएमटी-पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहतील. पनवेल-ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी विभागात विशेष लोकल धावतील. ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असतील. बेलापूर/नेरूळ ते उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका सेवा उपलब्ध असतील.

हेही वाचा – शहरी नक्षलवाद; आरोपीला अंतरिम जामीन

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल गोरेगाव आणि बोरिवली दरम्यान जलद मार्गावरून चालविण्यात येतील. तसेच अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येतील. अंधेरी आणि बोरिवलीच्या काही लोकल गोरेगाव स्थानकापर्यंत चालविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणत्याही लोकल चालवण्यात येणार नाही.

Story img Loader