मध्य, पश्चिम रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक

मध्य, पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Megablock on Central Railway on Christmas Day Mumbai
रेल्वेवर मेगाब्लॉक (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.

मध्य रेल्वे

कुठे? : ठाणे – कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर  सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०.

परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल नियोजित थांब्यासह दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर रेल्वे

कुठे? : पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर (बेलापूर / नेरुळ – खारकोपर मार्ग वगळून) सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५.

परिणाम : सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल- सीएसएमटी अप लोकल आणि सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत सीएसएमटी- पनवेल / बेलापूर डाऊन लोकल हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल- ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे- पनवेल डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ठाणे- वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सुरू असतील. बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपरदरम्यान लोकल सुरू असतील. 

पश्चिम रेल्वे

कुठे ? : चर्चगेट – मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर  सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५.

परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट- मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 00:43 IST
Next Story
नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र प्रेक्षकांसाठी खुले; देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती
Exit mobile version