मुंबई : मध्य रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन मेगाब्लाॅक न घेता शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
way of dharavi redevelopment is cleared railway land finally transferred to DRP
धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, रेल्वेची २५.५७ एकर जमीन अखेर ‘डीआरपी’कडे हस्तांतरित
mumbai, mega block, central and western railway, maintenance work, local train, passengers, marathi news,
रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक

मुख्य मार्ग

कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. यावेळी लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील.

हेही वाचा – मराठा समाजाला दहा टक्के आरक्षणाचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित, आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान

हार्बर मार्ग

कुठे : मानखुर्द ते नेरुळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर / वाशीकडे अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते मानखुर्द दरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४.३० या कालावधीत ट्रान्स हार्बर / मुख्य मार्गावर प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

हेही वाचा – मुंबई : सोन्या-चांदीच्या कारखान्यांची भट्टी आणि धुरांडी हटवली, महापालिकेची गिरगाव, मुंबादेवीत कारवाई

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ ते माहीम अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत

परिणाम : ब्लाॅक कालावधीत अप धीम्या मार्गावरील काही लोकल अंधेरी ते चर्चगेट दरम्यान जलद मार्गावर धावतील. या लोकलचा अंधेरी – वांद्रे – दादर – मुंबई सेंट्रल – चर्चगेट असा मार्ग असेल.