मंगल हनवते

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईजवळ अरबी समुद्रात, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादरच्या इंदू मिलमध्ये आंतराराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. याच धर्तीवर आता घाटकोपरमधील चिरागनगरमध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण १६९ कोटी ५४ लाख रुपये खर्च करून या स्मारकाची उभारणी करणार आहे. या स्मारकासाठी एकूण २,४४,६२२.६६ चौ. फूट बांधकाम करण्यात येणार असून स्मारकात अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा, अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कक्ष, वाचनालय यासह विविध सुविधांचा समावेश असणार आहे.

Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…
teacher built a democratic gudhi for Public awareness and to increase voter turnout
शिक्षकाने उभारली चक्क लोकशाही गुढी! मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पती-पत्नीकडून जनजागृती
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
mumbai IIT
मुंबई आयआयटीचे ३६ टक्के विद्यार्थी ‘कॅम्पस प्लेसमेंट’च्या प्रतीक्षेत

मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्याचे मुख्य उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवून झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणाऱ्या झोपु प्राधिकरणाने सामाजिक बांधिलकीने पहिल्यांदाच एक वेगळा प्रकल्प हाती घेतला आहे. प्राधिकरणाकडून घाटकोपर येथे अण्णाभाऊ साठे स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे. अण्णाभाऊ साठे यांचे वास्तव्य घाटकोपरमधील चिरागनगर झोपडपट्टीत होते. या चिरागनगर झोपडपट्टीचा पुनर्विकास करताना अण्णाभाऊ साठे यांच्या घराचे जतन करून तेथे त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची संकल्पना २०१९ मध्ये पुढे आली. ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी झोपु प्राधिकरणाने नियुक्त केलेल्या वास्तुविशारद योगेश धायगुडे यांनी या प्रकल्पाचा आराखडा तयार केला. झोपु प्राधिकरणाने सादर केलेल्या या आराखडय़ाला सरकारने मंजुरी दिली आहे. आता स्मारकासाठी आवश्यक त्या परवानग्या घेण्याचे काम झोपु प्राधिकरणाकडून सुरू आहे.

हा प्रकल्प अत्यावश्यक प्रकल्प म्हणून घोषित करावा, तसेच १६९ कोटी ५४ लाख ९६ हजार ८२२ रुपयांच्या अंदाज पत्रकाला मंजुरी मिळावी यासाठीचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता असून येत्या दोन महिन्यात बांधकामासाठी निविदा काढण्यात येतील. निविदा प्रक्रिया पूर्ण करून येत्या सहा महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे झोपु प्राधिकरणाचे नियोजन आहे. तसेच बांधकाम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत स्मारक पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. या

प्रकल्पाचा संपूर्ण खर्च झोपु प्राधिकरण करणार आहे.

चिरागनगर येथील झोपडय़ांचा पुनर्विकास करत झोपु प्राधिकरणाला ११२५२ चौ मीटरचे क्षेत्रफळ स्मारकासाठी उपलब्ध होत आहे. यात अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा आणि पाच मजली इमारतीचा समावेश असेल. झोपडपट्टीमधील गरीब विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा पुरवून त्यांना घडविण्याचा प्रयत्न या स्मारकाद्वारे केला जाणार आहे. त्यामुळेच या स्मारकाची ओळख प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणून निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

त्यासाठी यात स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका, वाचनालय अशा सुविधा पुरविण्यात येणार आहेत, अशी माहिती झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांनी दिली.

लोककला, साहित्याचे जतन

लोककला, शाहिरीकला यांची ओळख होण्यासाठी अण्णा भाऊ साठे कक्ष, शाहीर अमर शेख कक्ष, शोषित लढय़ाची साक्ष देणारे कक्ष, साहित्य कक्ष, दृकश्राव्य कक्ष, कला आणि साहित्य कक्ष, ५०० आसनी सभागृह, २००-२५० आसनी २ सिनेमागृहे, तालीम रूम, रेकॉर्डिग कक्ष, सभागृह, प्रशासकीय कार्यालय, उपाहारगृह, पुस्तक विक्री आणि भेटवस्तूंची दुकाने, प्रदर्शन कक्ष आदी सुविधा या स्मारकात असतील. या स्मारकाचे, तसेच प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राचे व्यवस्थापन खासगी कंपनीच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे.

घराचे जतन : चिरागनगर येथे अण्णा भाऊ साठे यांचे वास्तव्य होते. येथील त्यांच्या घराची दुरुस्ती करण्यात येणार असून त्याचे स्मारक प्रकल्पाअंतर्गत जतन करण्यात येणार आहे.