scorecardresearch

मुंबई : आग्रीपाडा येथे ५३ लाखांचे अमलीपदार्थ जप्त ; सराईत गुन्हेगाराला अटक

आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे त्याची अंदाजे किमत ५३ लाख ४० हजार असल्याची माहिती पथकाने दिली.

(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

आग्रीपाडा येथे अमलीपदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला वरळी युनिटच्या अमलीपदार्थ विरोधी कक्षाने गुरुवारी रंगेहात पकडले. त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे एकूण २६७ ग्रॅम एम.डी (मेफेड्रॉन) सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारभावाप्रमाणे त्याची अंदाजे किमत ५३ लाख ४० हजार असल्याची माहिती पथकाने दिली. तसेच, अटक केलेला ४६ वर्षीय आरोपी सराईत गुन्हेगार आहे.

हेही वाचा >>> मुंबई : तेलतुंबडे यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्याचे आदेश; आज सुटकेची शक्यता

मुंबई शहर आणि उपनगरांत अमलीपदार्थाची विक्री, पुरवठा आणि साठा करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यासाठी अमलीपदार्थ विरोधी पथकाने कंबर कसली आहे. आग्रीपाडा येथे अमली पदार्थांची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी आग्रीपाडा येथील नायर रुग्णालयाच्या समोर सापळा रचण्यात आला होता. यावेळी एका व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली दिसताच त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे पावडर सदृश्य पदार्थ सापडला. या पावडरची तपासणी केली असता ते २६७ ग्रॅम एम.डी असल्याचे उघड झाले. आरोपीविरोधात अमलीपदार्थ विरोधी कक्षाने वेगवेगळे गुन्हे दाखल करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला ३० नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:11 IST

संबंधित बातम्या