टाटा सन्सचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन झाल्यानंतर मर्सिडीजने पालघर पोलिसांकडे चौकशी अहवाल सोपवला आहे. मर्सिडीजने आपल्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, कार ताशी १०० किमी वेगाने धावत होती. तसंच अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक दाबवण्यात आला होता. प्रादेशिक वाहतूक कार्यालयानेही (RTO) प्राथमिक तपासाचा अहवाल पोलिसांकडे सोपवला आहे.

Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ

Arvind Kejriwal
अरविंद केजरीवालांची शुगर लेव्हल ३२० वर, अखेर तुरुंगात पहिल्यांदाच दिलं इन्सुलिन
Russian missile attack kills 13 in Ukraine
रशियन क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील १३ जण ठार
The Capital Markets Regulatory Authority imposed a fine of Rs 12 crore on Rabindra Bharti Educational Institute in an interim order
वित्तरंजन: हजार टक्क्यांच्या परताव्याचे आमिष
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?

सायरस मिस्त्री यांचा रविवारी दुपारी डहाणूजवळील चारोटी येथील भीषण अपघातात मृत्यू झाला. सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येताना झालेल्या या अपघातामध्ये मिस्त्रींसहीत त्यांच्यासोबत जहांगीर पंडोल यांचाही मृत्यू झाला. या अपघाताच्या तपासाचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज बेन्झ जीएलसी गाडीतील डेटा चीप ही जर्मनीला पाठवण्यात आली होती.

मर्सिडीजने अहवालात काय सांगितलं आहे?

मर्सिडीजने अहवालात सांगितलं आहे की, अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक दाबवण्यात आला होता. यावेळी कारचा वेग ताशी १०० किमी इतका होता. अनहिता यांनी ब्रेक दाबला तेव्हा कारचा वेग ताशी ८९ किमी वर पोहोचला आणि पुलाला धडक दिली.

पोलिसांनी कंपनीकडे अनहित यांनी कार ताशी १०० किमी वेगात असताना ब्रेक दाबला की त्याच्याआधीच दाबला होता अशी विचारणा केली होती. तसंच किती वेळा ब्रेक दाबवण्यात आला होता असंही विचारण्यात आलं होतं.

सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर आनंद महिंद्रांनी घेतली शपथ; म्हणाले “यापुढे मी कधीच…”

पुढील माहिती मिळवण्यासाठी, मर्सिडीज कंपनी १० सप्टेंबरला अपघातग्रस्त कार १२ सप्टेंबरला शोरुममध्ये घेऊन जाणार आहे. हाँगकाँगमधील एक पथक येऊन या कारची पाहणी करणार असून, त्यानंतर सविस्तर चौकशी अहवाल सोपवला जाईल.

हाँगकाँमधील पथकाने व्हिसासाठी अर्ज केला आहे. जर पुढील ४८ तासात व्हिसा मिळाला नाही, तर भारतातील टीम या वाहनाची पाहणी करुन अहवाल सादर करणार आहे.

आरटीओ अधिकाऱ्यांच्या रिपोर्टमध्ये काय आहे?

आरटीओने आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा चार एअरबॅग उघडल्या होत्या. या चारही एअरबॅग पुढील बाजूस होत्या. यामधील एक एअरबॅग चालकाच्या डोक्यापुढे, दुसरी गुडघ्याजवळ आणि तिसरी त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूला उघडली होती. चौथी एअरबॅग चालकाच्या बाजूच्या सीटवरील पुढील बाजूला होती.