‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – अंधेरी मेट्रो ७’ मार्गिकेवरील दहिसर – डहाणूकरवाडी – आरेदरम्यानची मेट्रो सेवा रविवार, ८ जानेवारी रोजी पूर्णतः बंद रहाणार आहे. काही तांत्रिक कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे या काळात दोन्ही मार्गिकांवर १६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा- Mumbai weather update : पुढील आठवड्यात मुंबईचे तापमान १५ अंश सेल्सिअसच्या खाली जाणार – हवामान विभागाचा अंदाज!

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
car charging point
वसई विरार शहरात चार्जिंग केंद्र उभारणार
Pune, Metro Line, Extensions, PMRDA, Mahametro, Clash, Project Responsibility,
पुण्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे गाडे अडले; काम कोण करणार यावरून तिढा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी टप्पा १, टप्पा २ या दोन्ही मार्गिकांवर एकात्मिक सिग्नल प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी रविवारी तब्बल १६ तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे रविवारी ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’ची सेवा पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन एमएमआरडीएने केले आहे.

एकात्मिक सिंगल प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेल्या पहिल्या टप्प्यांतील सेवा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे रविवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजपर्यंत दहिसर – डहाणूकरवाडी – आरे या २० किमी लांबीच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत मेट्रो सेवा बंद असेल, असे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एप्रिल २०२२ पासून ही मेट्रो सेवा सुरू झाली असून त्यानंतर पहिल्यांदाच उद्या ही मेट्रो सेवा पूर्णतः बंद राहणार आहे. दरम्यान, रविवार प्रवाशांची संख्या कमी असते. त्यामुळे मेगाब्लॉकचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर फटका बसण्याची शक्यता नाही. या काळात ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’च्या डहाणूकरवाडी ते आरेदरम्यान पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध नसेल.

हेही वाचा- VIDEO : मुंबईतील जुहू चौपाटीवर आदित्य ठाकरेंकडून ड्रम वादन; नेटकरी म्हणाले, “भाजपा अन् शिंदे गटाचा…”

मेगाब्लॉक दरम्यान कामाचे स्वरूप

• पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक यांसारख्या सिस्टीमची एकात्मिक चाचणी करणे.

• दुसऱ्या टप्प्यात चाचणी होत असलेल्या तसेच वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रणालीसोबत पहिल्या टप्पा संरेखीत करणे.

• प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी संपूर्ण प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासणे.

हेही वाचा- मुंबई, पुण्याची हवा बिघडली; पुढील दोन दिवस मुंबईत अतिधोकादायक, तर पुण्यातील हवा धोकादायक पातळीवर

प्रकल्पाची संपूर्ण स्थापत्य, तसेच प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत, लवकरच ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’चा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. ही मार्गिका पादचारीपुलाद्वारे ‘मेट्रो मार्ग १’सोबत जोडली गेल्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.