मेट्रो ४ आणि ४ अ च्या कामाला गती, आतापर्यंत ४१ टक्के काम पूर्ण

वडाळा ते कासारवडवली या ३२.३२ किमीच्या आणि ३२ स्थानकांच्या मेट्रो ४ चे बांधकाम २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. या मार्गिकेचा विस्तार कासारवडवली ते गायमुख असा करण्यात आला आहे.

metro 4 work now speed up, 41 percentage work completed ( photo courtesy - social media )
मेट्रो ४ आणि ४ अ च्या कामाला गती, आतापर्यंत ४१ टक्के काम पूर्ण ( फोटो सौजन्य – सोशल मीडिया )

मुंबई : मुंबई आणि ठाण्याला जोडण्यासाठी मेट्रो ४ (वडाळा ते कासारवडवली) आणि मेट्रो ४ अ (कासारवडवली ते गायमुख) अशी एकूण ३५.२५ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. या मार्गिकेचे काम पुढील दोन ते अडीच वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने अखेर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नियोजन असून आतापर्यंत दोन्ही मार्गिकांचे मिळून ४१ टक्के काम पूर्ण झाले आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा… Maharashtra News Live : महाराष्ट्राशी संबंधित विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

वडाळा ते कासारवडवली या ३२.३२ किमीच्या आणि ३२ स्थानकांच्या मेट्रो ४ चे बांधकाम २०१९ पासून सुरू करण्यात आले आहे. या मार्गिकेचा विस्तार कासारवडवली ते गायमुख असा करण्यात आला आहे. मेट्रो ४ अ अशी ही विस्तारित मार्गिका असून ती २.८८ किमीची आहे. यात दोन मेट्रो स्थानिकांचा समावेश आहे.मेट्रो ४ च्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली असून त्यानंतर विस्तारित मेट्रो ४ अ च्या कामाला सुरुवात झाली आहे. करोनामुळे तसेच काही कंत्राटदारांनी कामात कुचराई केल्याने कामाचा वेग मंदावला होता. पण आता मात्र कामाला वेग देण्यात आला आहे.

हेही वाचा… विश्लेषण: ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पाठ सोडेना! नेमकं कारण काय? वातावरण बदल की… वाचा सविस्तर

एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही मार्गिकांचे मिळून सप्टेंबर अखेरपर्यंत ४०.९१ टक्के काम पूर्ण झाले आहे. मे महिन्यात कामाची टक्केवारी ३६.७९ टक्के होती. ३१ मे पर्यंत मेट्रो ४ मार्गिकेतील व्हायाडक्टचे ४३.४४ टक्के तर मेट्रो ४ अ मधील व्हायाडक्टचे ३९.०३ टक्के काम पूर्ण झाले होते. तर आता ३० सप्टेंबर मेट्रो ४ मार्गिकेतील व्हायाडक्टचे ४६.७४ टक्के तर मेट्रो ४ अ मधील व्हायाडक्टचे ४३.७९ टक्के काम पूर्ण झाले आहे. मेट्रो ४ मधील स्थानकांचे ३१ मे पर्यंत २५.२० टक्के तर मेट्रो ४ अ मधील स्थानकांचे १९.८२ टक्के काम पूर्ण झाले होते. आता ३१सप्टेंबर पर्यंत मेट्रो ४ मधील स्थानकांचे ३१ मे पर्यंत ३०.०५ टक्के तर मेट्रो ४ अ मधील स्थानकांचे २८.४६ टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकांचे काम लवकरात लवकर पूर्ण करून मुंबई आणि ठाणे प्रवास सुकर करण्याचे एमएमआरडीएचे उद्दिष्ट आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-10-2022 at 13:04 IST
Next Story
“बिकेसीवर गटारी साजरी करणारी मंडळी…”; भास्कर जाधवांचा शिंदे गटाला खोचक टोला
Exit mobile version