मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज दोन्ही विमानतळाना जोडणाऱ्या २२हजार कोटी रुपये खर्चाच्या मेट्रो प्रकल्पास मान्यता देण्यात आली.
या बैठकीला फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या विस्तारित नागपूर – गोंदिया, भंडारा – गडचिरोली महामार्ग कामास गती देण्याचे आदेश दिले. या प्रकल्पांची कामे विहित कालावधीत पूर्ण करावी, प्रकल्प रेंगाळू नये असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो लाईन ८ चे भूसंपादनासह विविध मंजुरीचे कामे पुढील सहा महिन्यात पूर्ण करावी. त्यानंतर प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करण्यात यावा.हा प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच सर्व परवानगी प्राप्त करून घ्याव्यात असे आदेशही फडणवीस यांनी दिले.
आजच्या बैठकीत
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रो लाईन ८ जोडणीस मान्यता देण्यात आली. या
मेट्रो मार्गाची एकूण लांबी 3ल३५ किलोमीटर असून त्यातील भूमिगत मार्ग ९.२५ किलोमीटर तर उन्नत मार्ग २४किमीअसून एकूण २० स्थानके असतील.यातील ६ स्थानके भूमिगत तर१४ स्थानके उन्नत असतील.
त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल३ स्थानक ते घाटकोपर पूर्व पर्यंत भूमिगत स्थानके, घाटकोपर पश्चिम स्थानक ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 2 स्थानकापर्यंत उन्नत स्थानकेअसतील. दोन स्थानकांतील सरासरी अंतर 1.9 किलोमीटर असेल. या प्रकल्पासाठी ३०.७ हेक्टर भूसंपादनाची आवश्यकताअसून भूसंपादनासाठी ३८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
नाशिक शहर परिक्रमा मार्गासही मान्यता
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर परिक्रमा मार्गाला गती, मार्गाची एकूण लांबी 66.15 किलोमीटर, या प्रकल्पासाठी एकूण 3 हजार 954 कोटीच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
तसेच गडचिरोली जिल्ह्यातील खनिज वाहतुकीसाठी नवेगाव मोरे – कोनसरी – मूळचेरा – हेदरी – सुरजागड महामार्गाच्या सुधारित 85.76 किलोमीटर लांबीस मान्यता देण्यात आली. हा चार पदरी सिमेंट काँक्रिटकरणाचा महामार्ग असेल
