‘शरीरविक्री करणाऱ्या एचआयव्हीबाधित महिलेची सुटका समाजासाठी धोकादायक’

प्रकरणातील महिला एचआयव्हीबाधित असून लैंगिक संबंधांतून ती हा आजार संक्रमित करू शकते.

मुंबई : शरीरविक्री करणाऱ्या एचआयव्हीबाधित महिलेची सुटका केल्यास ते समाजासाठी धोकादायक ठरू शकते, असे नमूद करून तिला ताब्यात घेण्याचा महानगरदंडाधिकाऱ्यांचा आदेश दिंडोशी न्यायालयाने योग्य ठरवला.

शरीरविक्री करणाऱ्या या महिलेला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच मानवी तस्करी प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीटा) तिच्यावर आरोप करण्यात आले. तिला महानगरदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्या वेळी ती एचआयव्हीबाधित असल्याचे उघड झाल्याने तिची काळजी घेण्याच्या व संरक्षण देण्याच्या दृष्टीने महानगरदंडाधिकाऱ्यांनी तिला दोन वर्षे ताब्यात ठेवण्याचे आदेश दिले होते; परंतु ही महिला वेश्या व्यवसायात सहभागी नसल्याचा दावा करून तिच्या वडिलांनी या आदेशाला िदडोशी न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने मात्र प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) वाचल्यावर संबंधित महिला वेश्या व्यवसायात असल्याचे सकृद्दर्शनी स्पष्ट होत असल्याचे आणि पीटा कायद्याअंतर्गत ती पीडित असल्याचे नमूद केले.

न्यायालयाने काय म्हटले?

प्रकरणातील महिला एचआयव्हीबाधित असून लैंगिक संबंधांतून ती हा आजार संक्रमित करू शकते. परिणामी तिची सुटका करणे हे समाजासाठी धोकादायक ठरू शकते, असे न्यायालयाने महानगर दंडाधिकाऱ्यांचा आदेश योग्य ठरवताना स्पष्ट केले. तिला ताब्यात घेऊन तिची योग्य ती काळजी घेतली जाईल व तिला संरक्षणही दिले जाईल, परिणामी ती भविष्यात सामान्य जीवन जगणे शक्य होईल, असे नमूद करत महानगरदंडाधिकाऱ्यांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Metropolitan magistrate order to take custody of hiv positive sex worker zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या