लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या चार हजार ६५४ (१४ भूखंडासह) घरांच्या सोडतीमधील ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील दोन हजार ४८ घरांसाठी उद्या, शुक्रवारपासून अनामत रकमेसह अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. विरार- बोळींजमधील या दोन हजार ४८ घरांची काही कारणांमुळे विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे या घरांचा ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेत समावेश करण्यात आला आहे.

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?
Professor arrested for taking bribe to accept PhD thesis
विद्येच्या माहेर घरात शिक्षणाचा बाजार! पीएचडीचा प्रबंध मान्य करण्यासाठी लाच घेणारी प्राध्यापिका अटकेत

कोकण मंडळाच्या विरार-बोळीज प्रकल्पातील दोन हजार ४८ घरांसाठी तीन वेळा सोडत काढण्यात आली होती. मात्र या घरांची विक्री होऊ शकली नाही. त्यामुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्वावर या घरांची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनामत रक्कमेसह सर्वप्रथम अर्ज सादर करणाऱ्या पात्र अर्जदाराला घर वितरित करण्यात येणार आहे.

आणखी वाचा- मुंबईत संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता

या योजनेसाठीच्या अर्ज विक्री- स्वीकृतीसाठी कमी कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजल्यापासून अर्ज विक्री- स्वीकृतीस सुरुवात होणार आहे. या योजनेतील घरासाठी १२ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे. या घरांसाठीच्या पात्र अर्जदारांची प्रारूप यादी २७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता, तर अंतिम यादी ४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर १० मे रोजी यशस्वी अर्जदारांची यादी जाहीर होईल.