scorecardresearch

Premium

म्हाडा कोकण मंडळ सोडत नोव्हेंबर २०२३ : आतापर्यंत अनामत रक्कमेसह केवळ १०२६ अर्ज

म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार असून यासाठी सध्या अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ५,३११ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ १०२६ अर्ज सादर झाले आहेत.

Mhada Konkan Mandal Lottery
म्हाडा कोकण मंडळ सोडत नोव्हेंबर २०२३ : आतापर्यंत अनामत रक्कमेसह केवळ १०२६ अर्ज (प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५३११ घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार असून यासाठी सध्या अर्ज विक्री – स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत ५,३११ घरांसाठी अनामत रक्कमेसह केवळ १०२६ अर्ज सादर झाले आहेत. मागील मे २०२३ च्या सोडतीतील ४,६५४ घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने निम्म्याहून अधिक घरे विक्रीविना पडून आहेत. परिणामी, या सोडतीच्या प्रतिसादाकडे कोकण मंडळाचे लक्ष लागले आहे.

कोकण मंडळाच्या घरांना कायम मागणी चांगली असते. यापूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीत ठाणे, वसई-विरार आणि नवी मुंबईतील घरांना प्रचंड मागणी असल्याचे निदर्शनास आले होते. असे असताना मे २०२३ च्या सोडतीत मात्र ४६५४ घरांना खूपच कमी प्रतिसाद मिळाला होता. दोन हजारांहून अधिक घरे विकलीच गेली नाहीत. त्यामुळेच कोकण मंडळाने मेच्या सोडतीनंतर लगबगीने नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे.

ESIC Recruitment 2023
ESIC Recruitment 2023: पॅरामेडिकल आणि नर्सिंग स्टाफच्या पदांसाठी होणार बंपर भरती; ही आहे शेवटची तारीख
allotment JNPT developed plots, Project victims instructed CIDCO Bhawan documents
जेएनपीटी साडेबारा टक्के भूखंड प्रकिया ३ ऑक्टोबर पासून सुरू होणार; सिडको भवनात दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत कागदपत्रे स्वीकारणार
1 lakh 15 thousand applications for 377 different posts in panvel municipal corporation
पनवेल पालिकेच्या ३७७ जागांसाठी १ लाख १५ हजार अर्जांची नोंदणी; अर्ज नोंदणीचे शेवटचे तीन दिवस शिल्लक
WCL recruitment 2023
वेस्टर्न कोलफिल्डमध्ये ८७५ जागांसाठी होणार भरती, १०वी पास उमेदवार १६ सप्टेंबर पर्यंत करू शकतात अर्ज

हेही वाचा – “बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी लाईव्ह दाखवा”, सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख करत काँग्रेस नेत्याची मागणी

कोकण मंडळाच्या सोडतीत पंतप्रधान आवास योजनेतील आणि प्रथम प्राधान्य योजनेतील घरांना कमी प्रतिसाद मिळात आहे. पीएमएवायमधील घरे काहीशी महाग असून शहरांपासून दूर असल्याने या घरांना कमी प्रतिसाद मिळत असल्याची चर्चा आहे. विरार – बोळींजमधील गृहप्रकल्पात पाण्याचा प्रश्न गंभीर असून या घरांची विक्री होऊ शकलेली नाही. विरार – बोळींजमध्ये लवकरच सूर्या प्रादेशिक पाणी प्रकल्पाचे पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या सोडतीत समाविष्ट करण्यात आलेली ही घरे विकली जातील असा विश्वास कोकण मंडळाला आहे. पीएमएवायसाठीची वार्षिक उत्पन्न मर्यादा तीन लाख रुपयांवरून सहा लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक इच्छुक या घरांसाठी अर्ज करू शकतील. परिणामी, या घरांनाही चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

येत्या ३ नोव्हेंबर रोजी पात्र अर्जांची अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. अर्ज विक्री – स्वीकृती सुरू होऊन एक आठवडा उलटला असून या कालावधीत फारच कमी प्रतिसाद मिळाला आहे. मंडळाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळपर्यंत ५,३११ घरांसाठी २,७९१ इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. यापैकी केवळ १,०२६ जणांनी अनामत रक्कमेसह अर्ज सादर केले आहेत.

खासगी विकासकांच्या घरांना मागणी

कोकण मंडळाच्या सोडतीत २०२१ पासून २० टक्के योजनेतील घरांचा समावेश केला जात आहे. खासगी विकासकांच्या गृहप्रकल्पातील घरे म्हाडाच्या सोडतीद्वारे कमी किमतीत उपलब्ध होत असल्याने या घरांना मोठी मागणी आहे. २०२१ मध्ये २० टक्के योजनेतील ८१२ घरांसाठी दोन लाखांहून अधिक अर्ज सादर झाले होते. तर मे २०२३ च्या सोडतीतही २० टक्क्यांतील घरांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि ही घरे मोठ्या संख्येने विकली गेली. अशीच स्थिती नोव्हेंबरच्या सोडतीत असेल अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत दाखल झालेल्या १०२६ अर्जांपैकी सर्वाधिक ७२५ अर्ज २० टक्के योजनेतील घरासाठी आहेत.

हेही वाचा – दादरमधील १५ मजली इमारतीला आग; घुसमटल्यामुळे वृद्धाचा मृत्यू

अर्जांची माहिती

योजना – एकूण घरे – अर्ज विक्री – अर्जस्वीकृती (अनामत रक्कमेसह दाखल अर्ज)

पीएमएवाय – १०१० – २१४ -८५

१५ टक्के एकात्मिक योजना – १०३७ – ४४० – १६७

२० टक्के – ९१९ – २००८ – ७२५

म्हाडा प्रकल्प – ६७ – ३ – १

प्रथम प्राधान्य – २२७८ – १२६ – ४८

एकूण – ५३११ – २७९१ – १०२६

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mhada konkan mandal lottery november 2023 till now only 1026 applications with deposit amount mumbai print news ssb

First published on: 23-09-2023 at 15:01 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×