Premium

‘म्हाडा’ मुंबई मंडळ सोडत २०२३:मध्यम गटातील दादरमधील एक घर अखेर सोडतीतून वगळले

मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सोडतीसाठी उपलब्ध झालेल्या मध्यम गटातील एका घरावर (संकेत क्रमांक ४६१) बृहतसूचीतील (मास्टरलिस्ट) रहिवाशाने दावा करीत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

mhada
म्हाडा (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

न्यायालयीन वादात घर अडकल्याने मुंबई मंडळाचा निर्णय

मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून सोडतीसाठी उपलब्ध झालेल्या मध्यम गटातील एका घरावर (संकेत क्रमांक ४६१) बृहतसूचीतील (मास्टरलिस्ट) रहिवाशाने दावा करीत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या सोडतीतून दादरमधील हे घर वगळण्यात आले. न्यायप्रविष्ट असलेले हे घर सोडतीतून रद्द करण्याबाबतचे शुद्धिपत्रक शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले. या घरासाठीची अर्ज विक्री-स्वीकृती बंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई मंडळाच्या ४ हजार ८३ घरांच्या सोडतीसाठीची अर्ज विक्री-स्वीकृतीची प्रक्रिया २२ मेपासून सुरू झाली असून ही प्रक्रिया २६ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र या सोडतीतील दादर परिसरातील (मध्यम गट – संकेत क्रमांक ४६१) सावित्री निवास आणि लक्ष्मी निवासमधील घरासाठी इच्छुक असलेल्यांना आता अर्ज करता येणार नाही. हे घर सोडतीतून रद्द करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mhada lottery 2023 a middle class house in dadar was finally left out of the draw amy

Next Story
मुंबई पोलीस दलातील २५० निरीक्षकांच्या बदल्या, २० अधिकाऱ्यांचा बढतीसाठी पात्र निवडसूचीमध्ये समावेश