मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ (११७ भूखंडांसह) घरांसाठी बुधवारी सोडत काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात दुपारी १ वाजता सोडतीचा कार्यक्रम होणार आहे.

या सोडतीत २४ हजार ९११ पात्र अर्जदार सहभागी होणार असले, तरी त्यातील ९० टक्क्यांहून अधिक अर्थात २३ हजार ५७४ अर्जदार हे २० टक्के योजनेतील ५९४ घरांच्या सोडतीत सहभागी होणार आहेत. २० टक्क्यांतील घरांना अर्जदारांनी सर्वाधिक पसंती देतानाच म्हाडा गृहनिर्माण आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरांना नापसंती दिली आहे. त्यामुळे या योजनेतील ७१३ घरांसाठी अर्जच आलेले नाहीत. शून्य प्रतिसादामुळे ती घरे रिक्त राहणार असून रिक्त घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Mumbai Over 70 percent of 23 8 km Vadape thane highway concreting on mumbai nashik highway is complete
वडपे – ठाणेदरम्यानच्या आठ पदरीकरण आणि काँक्रीटीकरणाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
BMC financial condition information in marathi
घटलेल्या मुदतठेवी आर्थिक स्थितीचा एकमेव निकष नाही; पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे मत
Nagpur-Mumbai, Samruddhi Highway, Igatpuri Amane, MSRDC, Anil Kumar Gaikwad, final phase, traffic service, eight-hour journey, Maharashtra, engineering, high-speed travel,
Nagpur Mumbai samruddhi highway : समृद्धी महामार्गातील इगतपुरी – आमणे टप्पा सप्टेंबरअखेर वाहतूक सेवेत दाखल होणार
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
thane case of cheating woman was duped of 7 lakh 60 thousand by being promised ₹35 lakh house under mhada scheme for 21 lakh
म्हाडाचे घर मिळवून देण्याची बतावणी करत फसवणूक
Rohit Sharma Statement Rishabh Pant Controversial Wicket in IND vs NZ Mumbai test said The bat was close to the pads
IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?

कोकण मंडळाकडून २२६४ घरांसाठी ११ ऑक्टोबरपासून अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मूळ वेळापत्रकानुसार ही प्रक्रिया १० डिसेंबरपर्यंत होणार होती, तर सोडत २७ डिसेंबरला काढण्यात येणार होती. मात्र विहित मुदतीत घरांना प्रतिसाद न मिळाल्याने सोडतीला दोनदा मुदतवाढ देण्यात आली. परिणामी सोडतीची तारीख दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, अखेर ५ फेब्रुवारीला सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बुधवारी ठाण्यात सोडत काढली जाणार आहे. या सोडतीकडे अर्जदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बुधवारची सोडत नेमकी किती घरांसाठी असेल याबाबत कोकण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यास नकार देण्यात आला.

कोणत्या घरांसाठी किती अर्ज कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी एकूण २४ हजार ९११ पात्र अर्ज सादर झाले आहेत. १५ टक्के योजनेतील ८२५ घरांसाठी केवळ ४१७ अर्ज दाखल झाले असून ४०८ घरांना प्रतिसाद मिळालेला नाही. म्हाडा गृहनिर्माण योजनेतील ७२८ घरांसाठी केवळ ४३४ अर्ज दाखल झाले असून ३०५ घरांना शून्य प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, २२६४ घरांच्या सोडतीतील ११७ भूखंडांसाठी १४७ अर्ज सादर झाले आहेत.

Story img Loader