मुंबई : दरवर्षीप्रमाणे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण करून अतिधोकादायक इमारतींची यादी शुक्रवारी प्रसिद्ध केली. या यादीनुसार ८२ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. यातील ४३ इमारती मागील वर्षीच्या यादीतील आहेत. आता या अतिधोकादायक इमारतीतील २१०२ रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करून इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान दुरूस्ती मंडळासमोर आहे.
दक्षिण मुंबईतील सर्वच उपकरप्राप्त इमारती धोकादायक असल्याने पावसाळ्यात इमारती कोसळण्याच्या आणि त्यात जिवितहानी होण्याच्या घटना घडतात. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्या आधी सर्व इमारतींचे सर्वेक्षण करून अतिधोकादायक इमारतींचा शोध घेऊन यादी प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर या इमारतींना नोटीसा बजावून इमारती रिकाम्या करून घेतल्या जातात. त्यानुसार शुक्रवारी दुरूस्ती मंडळाने अशी यादी प्रसिद्ध केली असून यात ८२ इमारती अतिधोकादायक ठरल्या आहेत.
या अतिधोकादायक इमारतीत २२५६ निवासी आणि ४८० अनिवासी असे एकूण २७३६ रहिवासी आहेत. मंडळातर्फे याआधीच १७६ निवासी रहिवाशांना घरे रिकामी करम्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार २९ रहिवाशांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर करण्यात आले आहे. तर ३६ रहिवाशांनी स्वतची पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे २१०२ रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आव्हान दुरूस्ती मंडळासमोर आहे. दरम्यान मंडळाकडे केवळ ५०० संक्रमण शिबिराचे गाळे असल्याने उर्वरित रहिवाशांना दरमहा २० हजार घरभाडे दिले जाणार आहे.
८२ अतिधोकादायक इमारतींची यादी पुढीलप्रमाणे :
१. ३० सी-३० डी , बोमनजी लेन
२. १२०, बोरा बाजार स्ट्रीट
३. १५, तांडेल क्रॉस लेन
४. १००-१०२, कांबेकर स्ट्रीट
५. ७१-७७, सॅम्युअल स्ट्रीट
६. इमारत क्रमांक २३-२७, बनियन स्ट्रीट
७. इमारत क्रमांक ४०, बापू कोर्ट स्ट्रीट
८. इमारत क्रमांक ४०४-४१६, ४१६ ए, शेख मेमन स्ट्रीट, २-१८, के एम शर्मा मार्ग, सी २०८-२१५ व ९४३-४४/१२१२-१५
९. इमारत क्र. ४०४-डी, काळबादेवी रोड
१०. इमारत क्र. १५७/३, कावेल क्रॉस लेन क्र. ५
११. इमारत क्र. ८३-८५, ट्रिनिटी स्ट्रीट
१२. इमारत क्र. ३७७-अ, जे. एस. एस. रोड
१३. इमारत क्र. ७-९, रोपा लेन
१४. इमारत क्र. २५, नवरोजी स्ट्रीट
१५. इमारत क्र. २२-३४, व्ही. पी. रोड
१६. इमारत क्र. ५१. फर्स्ट कारपेंटर स्ट्रीट
१७. ३१ ए, मामा परमानंद मार्ग, गिरगाव
१८. १६-२२ ए, खत्तर अली लेन, गिरगांव
१९. ११-१३. एम. के. रोड, गिरगांव
२१. ३१६- एबी, ११., व्ही.पी. रोड, गिरगांव
२२. २४७-बी, व्ही.पी. रोड, गिरगाव
२३. १४४-१६८, कल्याण इमारत, गिरगाव
२४. ८८ डी-८८जी, खाडीलकर रोड, गिरगाव
२५. ४१-४३-४५ जे एस एस रोड, गिरगाव
२६. १४, (मंचाराम निवास), शेणवी वाडी, गिरगाव
२७. १२. (विष्णू निवास), शेणवी वाडी, गिरगाव
२८. २१-बीसी, खाडीलकर रोड, गिरगाव
२९. इमारत क्र. ३१४-बी, व्ही.पी. रोड, गिरगाव
३०. इमारत क्र. ५-जे. दुभाष लेन, गिरगाव
३१. इमारत क्र. ६६-६६ए ६८-६८ए, तात्या घारपुरे पथ, गिरगाव
३२. २२ मातृवंदना, खेतवाडी ६ वी लेन
३३. २-८. पाववाला स्ट्रिट
३४. १, खेतवाडी १२ वी लेन, वाघेला कुपर
३५. ४२७- ई. एम. एस. अली. रोड
३६. ३४६-३४८ ए, बेलासिस रोड
३७. ३, राघवजी रोड
३८. २५, ससेक्स रोड, माझगाव
३९. ८६ बी, मापलावाडी मोतीशा लेन, माझगाव
४०. ७-९ ए व १-९, हाथीबाग रोड
४१. १० हाथी बाग रोड
४२. २२, नारळवाडी रोड, माझगाव
४३. ५-१३, उनवाला बिल्डिंग, डी. एन सिंग रोड, हाथी बाग रोड
४४. २६, ससेक्स रोड माझगाव
४५. ७६ टॅंक बंदर रोड
४६. १४५-१५९ दिग्विजय मिल चाळ काळाचौकी रोड
४७. २-१८, बाबुला टॅंक रोड
४८. जगुली बिल्डिंग, इमारत क्र. ३१-३३. शेख हाफिजुद्दीन मार्ग / सांकली स्ट्रीट
४९. गुजरिया बिल्डिंग, इमारत क्र. २४१-२४३, मौलाना आझाद रोड
५०. इमारत क्र. ४४०-४४२, सर जे. जे. रोड
५१. इमारत क्र. ८५-९७, सोफिया झुबेर रोड व १-१५, १ ली पीरखान स्ट्रीट
५२. इमारत क्र. ६७-८१, सोफिया झुबेर रोड
५३. इमारत क्र. ९-११ बी, ८९-१०३, ९५-११५, १०३ए , मौलाना आझाद रोड
५४. इमारत क्र. ५०-६४, मौलाना आझाद रोड
५५. इमारत क्र. ४-६-८, मौलाना आझाद रोड
५६. इमारत क्र. १८०-१९६, डिमटीमकर रोड, १११-१२१, न्यू नागपाडा रोड, मरियम मंझिल
५७. इमारत क्र. १०, मौलाना आझाद रोड
५८. इमारत क्र. १२-२०, मौलाना आझाद रोड
५९. इमारत क्र. ३५, कामाठीपुरा १० वी लेन
६०. इमारत क्र. ६५-११, कामाठीपुरा ११ वी लेन
६१. नूर मंझिल, इमारत क्र. ६४२-६४४, फॉकलंड रोड
६२. लक्ष्मी बिल्डिंग, इमारत क्र. ८८-९०, ९०-९२, क्लेअर रोड
६३. इमारत क्र. १४-ABCD,रिटेबल स्ट्रीट
६४. इ.क्र. १०० डी न्यू स्टार मेन्शन, के.के. रोड
६५. कोळी चाळ नं. ३-३ ए, गणपतराव कदम मार्ग
६६. ३८-४०-४० ए, लक्ष्मी बिल्डिंग, भाउसाहेब तोडणकर मार्ग, एलफिस्टन रोड
६७. १०० ई, मेहर लॉज, के. के. रोड, सातरस्ता
६८. ३७३ ए साई प्रसाद, मुरारी घाग मार्ग,
६९. १४ फितवाला बिल्डिंग, एलफिस्टन रोड
७०. ९८ हाजी कासम चाळ, शाहीर अमर शेख मार्ग
७१. १४-१४ ए, १६-१६ ई, खरास बिल्डिंग, ना म जोशी मार्ग
७२. ४८, विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड
७३. ४६ दया विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड
७४. ८-८ सी, २६- २६ एफ, कॉर्नर चेंबर्स, शिवाजी पार्क रोड नं. ५, दादर, मुंबई उपकर क्रमांक जीन-४८७८ (१)
७५. ४३- ४५, गोरेगावकर वाडी, पोतुगीज चर्च रोड, दादर (प), उपकर क्रमांक GN- ३२३८ (२), GN-३२३६ (४),जीएन-३२३८ (१), जीएन-३२३६ (३)
७६. हेदवकर वाडी क्र.२, द. स. बाबरेकर मार्ग, गोखले रोड,
(उ), दादर (प), मुंबई उपकर क्रमांक GN- ४४४४(३)
७७ . ३६, कुबल निवास, गोखले रोड, दादर (प)
७८ . इमारत क्र. ३९-३९ अ व ४१-४१ ए, इलम महल, एस. के. बोले. रोड, दादर (प)
७९. इमारत क्र. २० जमाल हाऊस, दर्गा स्ट्रिट माहिम
८०. इमारत क्र.७ अअ, आनंद भुवन (जुनी) शिवाजी पार्क, रोड क्र.४, दादर-पश्चिम
८१. इमारत क्र. २७४-२७४ ए, मिनर्वा बिल्डींग, उपकर क्र. फ द-८२५ [१ए]. माधवदास पास्ता रोड, दादर (पू )
८२. इमारत क्र.१८४-१८४ एफ मिनर्वा मेन्शन, उपकर क्र. फ द-८२५ [१], डॉ. बी. ए. रोड, दादर (पू)
