लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील २०३० घरांच्या सोडतीतील स्वीकृती पत्र सादर केलेल्या आणि निवासी दाखला प्राप्त झालेल्या घरांच्या विजेत्यांकडून सदनिकेची विक्री किंमत भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे आता मंडळाने परत (सरेंडर) केलेल्या ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसातच प्रतीक्षा यादी कार्यान्वित केली जाणार आहे. प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांसाठी दिवाळीच्या मुहूर्तावर ही आनंदाची बातमी ठरणार आहे.

MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
two unidentified men robbed gold chain from woman
बोलण्यात गुंतवून वृद्ध महिलेची सोनसाखळी पळवली
Alleged irregularities in Zopu scheme demands inquiry into Murji Patel along with Akriti developers through petition
झोपु योजनेत अनियमितता केल्याचा आरोप, आकृती डेव्हलपर्ससह मुरजी पटेल यांच्या चौकशीची याचिकेद्वारे मागणी
young man killed due to dispute over bursting firecrackers
फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून ॲन्टॉप हिल येथे तरूणाची हत्या
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
maharashtra assembly election 2024 congress aspirants upset
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता; अल्पसंख्यांक जागा शिवसेनेला गेल्यामुळे काँग्रेसचे इच्छुक नाराज
youth upload selfie video before commit suicide
मृत्यूपूर्वी चित्रफीत अपलोड करून तरूणाची आत्महत्या

मुंबईतील विविध ठिकाणच्या २०३० घरांसाठी ८ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्यात आली. या सोडतीत २०३० घरांपैकी १३ घरांना शून्य प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ८ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात २०१७ घरांसाठीच सोडत काढण्यात आली. या सोडतीतील विजेत्यांपैकी १५३० विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिली आहे. स्वीकृती दिलेल्यांपैकी ज्यांच्या घरांना निवासी दाखला प्राप्त झाला आहे अशा ३०० हून अधिक विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र वितरित करण्यात आले आहे. तात्पुरते देकार पत्र प्राप्त विजेत्यांकडून सदनिकेची विक्री किंमत भरून घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. जे विजेते सदनिकेची १०० टक्के रक्कम भरतील त्यांना घराचा ताबा देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच आता परत करण्यात आलेल्या ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मंडळातील सूत्रांनी दिली. या निर्णयानुसार लवकरच प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना स्वीकृती पत्र पाठवण्यात येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांनी घरासाठी स्वीकृती दिल्यानंतर त्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांसाठी ही आनंदाची बाब आहे.

आणखी वाचा-पालिका आयुक्तांची सफाई कामगारांसोबत दिवाळी, कामगारांच्या वसाहतीला सपत्नीक भेट

म्हाडाच्या सोडतीच्या नवीन धोरणानुसार प्रतीक्षा यादी कमी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार २०२३ मध्ये १० घरामागे मागे एक अशी प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली होती. परिणामी मागील वर्षी प्रतीक्षा यादीवरील विजेते कमी असल्याने मोठ्या संख्येने घरे रिक्त राहिली. ही घरे २०२४ च्या सोडतीत समाविष्ट करण्याची वेळ मुंबई मंडळावर आली. ही बाब लक्षात घेता मुंबई मंडळाने २०२४ च्या सोडतीत प्रतीक्षा यादी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २०२४ च्या सोडतीत १० घरामागे पाच अशी प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने घरे रिक्त राहणार नाहीत. एकूणच आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. प्रतीक्षा यादीवरील प्राधान्य क्रमानुसार पहिल्या क्रमांकाच्या विजेत्याने घर नाकारल्यास दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला संधी मिळणार आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांचे लक्ष स्वीकृती पत्र प्रक्रिया पूर्ण होण्याकडे लागले आहे.

Story img Loader