मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सरळ सेवा भरती २०२१ मधील पात्र, नियुक्त उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील ४२१ जणांना सेवेत रुजू करण्यात येणार आहे. यासाठीच्या नियुक्ती पत्राचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ही पत्रे वितरित करण्यात येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ज्याप्रमाणे तरुणांना/उमेदवारांना नियुक्ती पत्र वितरित करण्यात आले त्याप्रमाणे म्हाडा भरती परीक्षेतील ५३३ पैकी ९ संवर्गातील ४२१ पात्र उमेदवारांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्याचा घाट घालण्यात आला आहे. दरम्यान, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर यांनी कार्यक्रम होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र अधिक माहिती देणे टाळले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada recruitment 2021 appointment letter 421 eligible candidates by chief minister thursday ysh
First published on: 29-10-2022 at 01:17 IST