आणखी दोन ३५ मजली  इमारती; न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी २७ मजली इमारतीत १२९ घरे प्रस्तावित

मुंबई : पहाडी गोरेगाव येथे म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पहिल्या टप्प्यात ३ हजार १५ घरे बांधली जात असून यात पहिल्यांदाच ३५ मजली इमारतीचा समावेश आहे, तर भविष्यात दुसऱ्या टप्प्यात येथे आणखी दोन ३५ मजली इमारतीसह न्यायालयीन कर्मचाऱ्यांसाठी २७ मजली इमारत प्रस्तावित आहे. ३५ मजली इमारतीत मध्यम गटासाठी ७०० तर, २७ मजली इमारतीत १२९ घरे असणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोरेगाव पहाडी येथील म्हाडाच्या मालकीच्या भूखंडांवर दुसऱ्या कोण्या व्यक्तीने मालकी हक्क दाखविल्याने हा भूखंड न्यायालयीन वादात अडकला होता. अखेर २५ वर्षांच्या लढाईनंतर हा भूखंड म्हाडाच्या ताब्यात आला आहे. हा भूखंड ताब्यात आल्यानंतर मंडळाने भूखंड अ आणि ब वर गृह प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २०१८ मध्ये ४ हजार ६०० घरांसाठी निविदा काढत या घरांच्या बांधकामाचे कंत्राट शिर्के कंपनीला दिले. म्हाडाच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उपस्थित केले जातात. तेव्हा या प्रकल्पात दर्जात्मक घरे बांधण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच पहिल्यांदाच म्हाडाच्या इतिहासात ३५ मजली इमारती बांधण्याचा निर्णय मंडळाने घेतला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada to build 0 homes for middle income group in pahadi goregaon mumbai print news zws
First published on: 06-02-2023 at 01:28 IST