Mumbai Hit and Run Case : मुंबईतल्या वरळी अपघातातला (Hit and Run Case )प्रमुख आरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याला अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे बीएमडब्ल्यू (BMW) कार चालवत मिहीर शाह याने कावेरी नाखवा आणि प्रदीप नाखवा या दोघांना उडवलं. यात प्रदीप नाखवा हे एका बाजूला पडले. तर कावेरी नाखवांना मिहीरने फरपटत नेलं. या भयंकर अपघातात कावेरी नाखवांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ६० तासांनी मिहीरला अटक करण्यात आली.

नेमका अपघात कसा झाला?

हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शाह रात्री जुहू येथील बारमध्ये मद्यप्राशन करत होता. त्यानंतर तो गोरेगावला गेला. घरी गेल्यानंतर त्याने त्याच्या चालकाला सांगितलं की आपल्याला लाँग ड्राईव्हवर जायचं आहे. प्रवासादरम्यान तो मुंबईतल्या वरळी भागात आला. त्यानंतर पुन्हा गोरेगावला जायला निघाला. गोरेगावला जाताना मिहीर शाह स्वतः कार चालवत होता असा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. तसंच जो अपघात झाला तो एट्रिया मॉलजवळ झाला. तिथपासून त्याने कावेरी नाखवा यांना फरपटत नेलं. हा अपघात झाला तेव्हा मिहीरने मद्यप्राशन केलं होतं. मिहीर शाह फरार होता. मात्र त्याला अटक करण्यात आली. आता या प्रकरणात मिहीर शाह माझं करीअर उद्ध्वस्त झाल्याचं म्हटलं आहे.

IAS Pooja Khedkar WhatsApp Chat Pune Collector Office
Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल
maharashtra mlc election final result list (1)
Maharashtra MLC Election Result: विधानपरिषद निवडणुकीत जयंत पाटील पराभूत; नेमकी कुणाची मतं कुणाकडे गेली?
IAS Puja Khedkar
IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप समोर; दिव्यांग असल्याचे सांगून UPSC परीक्षेत मिळवली सूट
Pooja Khedkar First Reaction
Pooja Khedkar : वादानंतर IAS पूजा खेडकर पहिल्यांदाच आल्या माध्यमांसमोर; घडल्या प्रकाराबाबत विचारणा केली असता म्हणाल्या…
IAS Pooja Khedkar Mother
पूजा खेडकरांच्या आईची पोलिसांना आणि माध्यमांना दमदाटी, म्हणाल्या, “मी सगळ्यांना…”
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
vivek oberoi says after bollywood ostracized him he focused on business
बॉलीवूडने बहिष्कार टाकल्यावर व्यवसाय करून घर चालवलं; विवेक ओबेरॉय वस्तुस्थिती मांडत म्हणाला, “आज २९ कंपन्यांमध्ये…”

हे पण वाचा- Worli Hit and Run Case : २३ वर्ष वय असतानाही मिहीर शाहला मद्य का देण्यात आलं? पब व्यवस्थापनाने सांगितले कारण

मिहीर शाह याने काय म्हटलं आहे?

“जी घटना घडली त्यामुळे माझं करीअर उद्ध्वस्त झालं आहे. मी गुन्हा कबूल केला आहे. माझ्याकडून ही घटना घडली. मात्र मला आता कळून चुकलंय की माझं करीअर संपलं आहे.” असं मिहीर शाह म्हणाल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे. मिहीर शाहने या अपघाताच्या आधी मद्यप्राशन केलं होतं.

मिहीर शाहला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

मिहीर शाहला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, अपघातानंतर कुटुंबावर हल्ला होईल या भीतीने आम्ही घर सोडले, असे मिहीरने चौकशीदरम्यान सांगितले आहे. अपघातानंतर मिहीरचे पालघरमधील आजी-आजोबाही घर सोडून गेले होते. तेथे वरळी पोलिसांचे पथक पोहोचले त्यावेळी मिहीरचे आजी-आजोबा दोन दिवसांपासून बाहेर गेल्याचे पोलिसांना समजले. मिहीर याच्या मोटरगाडीची क्रमांक पाटी (नंबरप्लेट) कोणी हटवली याबाबत पोलीस तपास करत आहेत. याशिवाय आरोपी मिहिरने आपल्याकडे चालक परवाना असल्याचे सांगितले आहे. पण अद्याप कुटुंबियांनी त्याचा चालक परवाना पोलिसांना दिला नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ओळख लपवण्यासाठी दाढी आणि केस कापले

आरोपी मिहीर शहा हा त्याचे मित्र आणि कुटुंबियांसह शहापूर येथे एका रिसॉर्टमध्ये होते. मिहीरने ओळख लपवण्यासाठी दाढी व केस कापले होते. मित्र आणि त्याने स्वत: मोबाइल बंद ठेवल्यामुळे पोलिसांना त्यांचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. मिहीर हा त्याच्या मित्रांशी मोबाईलवरून अनेकांशी संवाद साधत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अवघ्या १५ मिनिटांत पुन्हा मोबाईल बंद करण्यात आला. हाच धागा पकडून पोलिसांनी मिहीरला ताब्यात घेतले. त्यावेळी मिहीरने ओळख लपवण्यासाठी दाढी व केस कापल्याचे निष्पन्न झाले