काँग्रेसचे नेते, माजी खासदार मिलिंद देवरा यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी हा पक्षप्रवेश केला गेला असल्याचे सांगितले जाते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पक्षप्रवेश पार पडला. “मिलिंद देवरा यांच्यासह व्यापारी वर्ग, माजी नगरसेवक, जैन मारवाडी, गुजराती या समाजातील व्यापारी वर्ग पक्षात आल्यामुळे आनंद वाटतो. सर्व लक्ष्मीपूत्र पक्षात आलेत. मिलिंद देवरा म्हणाले की पुढील काही दिवसांत आणखी लोक पक्षात येणार आहेत. त्यामुळे हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे”, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले

मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश का केला? काय आहे राजकीय गणित?

eknath shinde criticized opposition
“वाघनखांवर आक्षेप म्हणजे, शिवरायांच्या शौर्याचा अपमान”; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले, “काही लोक…”
arvind kejriwal health
“केजरीवाल कोमात जाऊ शकतात”; आप खासदाराचा दावा, आप आणि तिहार तुरुंग अधीक्षकांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीबाबत मतभेद का आहेत?
Dr Madhav Kinhalkar, Dr Madhav Kinhalkar Resigns from BJP, Dr Madhav Kinhalkar next political decision, Bhokar Assembly constituency, nanded, sattakaran article, Maharashtra vidhan sabha election 2024,
सूर्यकांता पाटील यांच्यापाठोपाठ माधव किन्हाळकर यांचाही भाजपाला रामराम
Nana Patole on Eknath Shinde
“राज्याचे मुख्यमंत्री गंभीर माणूस नाहीत, खुर्ची वाचवणं हेच…”, नाना पटोलेंची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका
Andhra Pradesh Chief Minister N Chandrababu Naidu meets Prime Minister Narendra Modi in New Delhi
चंद्राबाबू यांची पंतप्रधानांशी चर्चा
Loksatta anvyarth Prime Minister Narendra Modi ministership Chandrababu Naidu
अन्वयार्थ: चंद्राबाबूंचे चोचले चालतील?
himanta biswa sarma
“वरिष्ठ आदिवासी नेत्याला मुख्यमंत्रिपदावरून हटवल्याने…”, आसामच्या मुख्यमंत्र्यांचा हेमंत सोरेन, JMM-काँग्रेसवर हल्लाबोल
rajendra yadav joined bjp marathi news
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सलग दुसरा धक्का, राजेंद्र यादव गटाच्या भाजपप्रवेशाने मलकापूरात काँग्रेसला मोठे खिंडार

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर ठरवलं, माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण राज्यासाठी खर्च करायचा. नकारात्मक भावना व्यक्त न करता फक्त सकारात्मक विचार घेऊन काम करायचं. आमच्या विचाराप्रमाणेच मुंबईच्या विकासाची दुरदृष्टी असलेला एक नेता आम्हाला मिळाला, याचा आज अतिशय आनंद होत आहे.

VIDEO : मिलिंद देवरांनी शिंदेंच्या शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ घेतला हाती; म्हणाले, “मी काँग्रेस सोडेन वाटलं नव्हतं, पण…”

सुई न टोचता ऑपरेशन करावं लागतं

मिलिंद देवरा यांचे स्वागत करत असताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “मिलिंद देवरा हे आज सपत्नीक इथे आले आहेत. मिलिंद देवरा यांनी प्रवेश घेताना ज्या भावना व्यक्त केल्या. दीड वर्षांपूर्वी मी निर्णय घेतला होता, तेव्हा माझ्याही मनात अशाच भावना होत्या. शेवटी निर्णय घ्यायचा म्हटला की धाडस तर कराव लागतं. मी ज्यावेळेस निर्णय घेतला, तेव्हा श्रीकांतच्या (खासदार श्रीकांत शिंदे) आईला आधी विश्वासात घेतलं. शेवटी कुणालातरी विश्वासात घेऊन आपल्याल मन मोकळं करावं लागतं. कारण काही ऑपरेशन असे असतात जिथे सुईदेखील न टोचता करावे लागतात. तसं ऑपरेशन मी दीड वर्षांपूर्वी केलं.”

माझ्यामुळे आयुक्त, आमदार हाती झाडू घेतात

“मी दर रविवारी मुंबईत डीप क्लीन ड्राईव्ह करण्यासाठी सकाळी सकाळी बाहेर पडतो. माझ्यामुळे आयुक्त, अधिकारी, आमदारही हाती झाडू घेतात, पाईप घेतात आणि रस्ते धुवून घेतात. टीका करणारे काही बोलू देत, पण मी कामावर लक्ष केंद्रीत करतो. डीप क्लीन ड्राईव्हमुळे प्रदूषणाची पातळी ३५० वरून १०० च्याही खाली आली आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

मला मोदींचे हात बळकट करायचे आहेत – देवरा

शिंदे गटात प्रवेश घेतल्यानंतर मिलिंद देवरा यांनी आपल्या भाषणात या निर्णयामागची भूमिका सांगितली. ते म्हणाले, “मी खूप भावूक आहे. मी काँग्रेस पक्ष सोडेन असं कधी वाटलं नव्हतं. पण, काँग्रेस पक्षाशी ५५ वर्षे असलेले नाते मी संपवत आहे. माझे राजकारण नेहमीच सकारात्मक राहिलं आहे. मुख्यमंत्री शिंदे हे मेहनती आणि सर्वांसाठी उपलब्ध असतात. जनतेच्या वेदना मुख्यमंत्र्यांना कळतात. म्हणूनच त्यांचे हात मला आणखी बळकट करायचे आहेत. शिवसेनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचेही हात मला बळकट करायचे आहेत.”