मुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक पाच लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणाल राऊत यांची बुधवारी या पदावर निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.  राज्याचे ऊर्जामंत्री व काँग्रेसचे नेते डॉ. नितीन राऊत यांचा कुणाल राऊत हा मुलगा आहे. प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी १४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यात कुणाल राऊत यांना  सर्वाधिक ५ लाख ४८ हजार २६७ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना ३ लाख ८० हजार ३६७ मते व शरण बसवराज पाटील यांना २ लाख ४६ हजार ६९५  मते मिळाली. कुणाल हे युवक काँग्रेसमध्ये अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. मोदी सरकारविरुद्ध जनतेत रान उठवू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

घराणेशाहीची परंपराच प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी पतंगराव कदम यांचे पुत्र डॉ. विश्वजित यांच्यानंतर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे तर आता ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल यांची निवड करण्यात आली आहे. युवक  काँग्रेसमध्ये जणू काही घराणेशाहीची प्रथा-परंपरा पडल्याचे चित्र आहे.

Shobha Bachhav, BJP Dhule,
धुळ्यात भाजप, काँग्रेसमध्ये चुरशीची लढत ? शोभा बच्छाव यांच्या उमेदवारीनंतर जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
Prime Minister Narendra Modis meeting in Baramati Lok Sabha Constituency
‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?
BJP youth leader in contact with Sharad Pawar group for candidacy from Raver
रावेरमधून उमेदवारीसाठी भाजपचा युवानेता शरद पवार गटाच्या गळाला?
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा