मुंबई : मुंबई महापालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक सुविधा, कला, व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्राबाबत देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा आढावा घेतल्यानंतर मालदीवचे शिक्षण राज्यमंत्री अब्दुल रशीद यांनी प्रशासनाचे कौतुक केले.
मुंबईमधील पालिकेच्या जी-दक्षिण विभाग कार्यालयाच्या हद्दीतील खान अब्दुल गफार खान मार्गावरील (वरळी सी फेस) शाळेला अब्दुल रशीद यांनी बुधवारी भेट दिली. पालिका शाळांमध्ये देण्यात येणारे शिक्षण, क्रीडा, व्यावसायिक आणि कला क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांना देण्यात येणार प्रशिक्षण आदींची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांना दिली. गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना पालिका शाळेत मिळत असलेल्या सुविधांबद्दल रशीद यांनी कौतुक केले. रशीद यांच्याशी सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी संजीवनी कापसे, शाळेच्या मुख्याध्यापिका नीशा म्हात्रे, बागेश्री केतकर, शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते. शाळेच्या सभागृहात आयोजित केलेल्या प्रदर्शनास रशीद यांनी भेट दिली. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेवर तयार केलेल्या वस्तू, विविध खेळांची आणि योगासनांची प्रात्यक्षिके, संगीत कला, सुतारकाम, शिवणकामाची प्रात्यक्षिके, स्काऊट गाईडच्या संबंधित बांबींचा समावेश होता. रशीद यांनी शाळेतील प्रयोगशाळा, टिंकिरग लॅब इत्यादींना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे, टाकाऊपासून टिकाऊ संकल्पनेवर तयार केलेल्या वस्तू, विविध खेळांची आणि योगासनांची प्रात्यक्षिके, संगीत कला, सुतारकाम, शिवणकामाची प्रात्यक्षिके, स्काऊट गाईडच्या संबंधित बांबींचा समावेश होता.

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
allahabad high court ani photo
“यूपी बोर्ड ऑफ मदरसा एज्युकेशन अ‍ॅक्ट घटनाबाह्य”, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निकाल; मदरसेही शिक्षण विभागाच्या अखत्यारीत!
10th students will get extra marks What is the reason
दहावीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार? काय आहे कारण? वाचा…