राज्यात बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्व्हेक्षणावरून राजकारणाचा पारा चढला आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गावाकडे गेले आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री नाराज असल्यानेच गावाकडे निघून गेल्याचीही जोरदार चर्चा आहे. याबाबत विचारलं असता शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (२५ एप्रिल) पत्रकारांशी बोलत होते.

“मुख्यमंत्री नाराज असल्याने गावाकडे निघून गेले” या तर्कवितर्कांवर बोलताना उदय सामंत म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहे असं कुणी म्हणत असेल, तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे.”

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा
bhavana gawali
“भावना गवळी यांना उमेदवारी न दिल्यास सामूहिक राजीनामे देणार,” शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना इशारा

“दिल्लीत मुख्यमंत्री बदलासाठी बैठका होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा”

दिल्लीत मुख्यमंत्री बदलासाठी बैठका होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय यावर उदय सामंत म्हणाले, “राजकीय वर्तुळात ८ दिवसांपासून चर्चा सुरू आहेत की, उरलेल्या १३ आमदारांपैकी ७ आमदार आमच्याबरोबर येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस फुटणार आहे अशीही चर्चा आहे. काँग्रेसचा बडा नेता भाजपात जाणार अशीही चर्चा आहे. राजकीय वर्तुळात भरपूर चर्चा आहेत. त्या तथ्यात उतरतील तेव्हात्याचा विचार करू.”

“मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पुढील विधानसभा निवडणूक होईल”

“पुढील दीड वर्षे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पुढील विधानसभा निवडणूक होईल,” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

“अपेक्षित होतं तसं आंदोलन होत नाही असं विरोधकांना कळलं”

बारसू प्रकल्पावर बोलताना उदय सामंत म्हणाले, “विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी काय मागणी केली हा नंतरचा विषय आहे. परंतु त्या ठिकाणची वस्तूस्थिती लक्षात घेतली पाहिजे. आंदोलन ज्या पद्धतीने होईल असं अपेक्षित होतं तसं आंदोलन होत नाही असं विरोधकांना कळलं. लोकांची समजूत काढण्यासाठी प्रशासन तत्पर आहे म्हणून या गोष्टी घडत आहेत.”

हेही वाचा : “राजकारणात पुतण्यांनी घोटाळा करून ठेवलाय”, म्हणून अजित पवारांना आव्हान? राऊतांच्या विधानावर भाजपाची प्रतिक्रिया, म्हणाले…

“मला सगळ्याच पक्षांना विनंती करायची आहे की, जर सर्व्हेक्षण थांबवायचं असेल, तर सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली पाहिजे आणि हा उद्योग आम्ही घालवतो आहे अशी भूमिका घ्यावी. मग बघू काय करायचं ते,” असं आव्हान उदय सामंत यांनी दिलं.