बांधकाम पूर्ण होऊनही उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असलेला डिलाइल रोड येथील पूल अद्यापही बंद आहे. यामुळे आसपासच्या परिसरातील वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत. याप्रकरणी त्यांनी आज पुन्हा एकदा सरकार, पालिका आणि एमएमआरडीएला धारेवर धरलं आहे. यासंदर्भातील एक्स पोस्ट त्यांनी केली आहे.

ते पोस्टमध्ये म्हणतात की, शिंदे-भाजपा सरकारचा इगो जपण्याकरता बंद ठेवलेला डिलाईल रोड पूल कृपया पालिकेने वाहतुकीसाठी खुला करावा. हा पूल १५ दिवसांपूर्वीच तयार झाला आहे आणि व्हीआयपींच्या हस्ते उद्घाटनाची वाट पाहिली जात आहे.

cm eknath shinde
…विकास हाच आमचा अजेंडा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्ट प्रतिपादन
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Eknath Shinde on Raj Thackeray
Eknath Shinde: राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बिनसलं? शिंदे यांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले…
Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Eknath Shinde On Heena Gavit :
Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदेंचा हिना गावितांना अप्रत्यक्ष इशारा; म्हणाले, “बंडखोरी…”
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर

तसंच, आदित्य ठाकरेंनी एमटीएचएल (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) प्रकल्पावरूनही एमएमआरडीएवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणतात की, तुमच्या मंत्र्यांचे इगो सांभाळण्याकरता तुम्ही नंतरही मोठा उद्घाटन कार्यक्रम घेऊ शकता. उर्वरित राहिलेले ५ टक्के काम पूर्ण करा आणि वापरासाठी खुले करा.

हेही वाचा >> आदित्य ठाकरे यांच्यासह पेडणेकर, आंबेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

“डिलाईल रोड आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंक दोन्हींची कामे पूर्ण झाली आहेत. परंतु, भाजपा-शिंदे सरकारमधील मंत्र्यांना मुंबईसाठी वेळ नसल्याने उद्घाटनाची प्रतिक्षा करावी लागत आहे”, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

दरम्यान, अंतिम टप्प्यात आलेले असताना लोअर परळ पुलावरील दक्षिण वाहिनी अवैधरित्या वाहतुकीसाठी खुली केल्याप्रकरणी वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आदित्य ठाकरे, विधान परिषदेतील आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर, स्नेहल आंबेकर आणि १५ ते २० अनोळखी व्यक्तींविरोधात मुंबई महापालिकेने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार ना. म. जोशी. पोलीस ठाण्याने शनिवारी पहाटे आदित्य ठाकरेंसह सर्वाविरुद्ध गुन्हा दाखल केला.