सर्वसामान्यांसाठी मंत्रालय प्रवेश अजूनही दिव्यच !

मंत्रालयात तात्पुरत्या कामानिमित्त येणाऱ्यांना सध्या ‘गार्डन गेट’ येथूनच प्रवेश दिला जात आहे

मुंबई : राज्यातील मंदिरे, मॉल, शाळा-महाविद्यालये सुरू झाली तरी तळागाळातील नागरिक मोठ्या अपेक्षेने आपल्या प्रशद्ब्रांची तड लावण्यासाठी जिथे येतात, त्या मंत्रालयाची दारे अजूनही सर्वसामान्यांकरिता बंद आहेत. इथे के वळ मंत्र्यांच्या किं वा सचिवांच्या शिफारसीने येऊ इच्छिणाऱ्यांनाच प्रवेश दिला जात आहे. प्रवेशावरील निर्बंधांमुळे कामाकरिता मंत्रालयात येणाऱ्या अधिकाऱ्यांचेही हाल होत आहेत.

एरवी दुपारी दोननंतर आधार, पॅनकार्डच्या आधारे सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश मिळत असे. पण, टाळेबंदी लागल्यानंतर या प्रवेशावर आलेले निर्बंध कायम आहेत. आता मंत्री कार्यालयाच्या शिफारस पत्रावरच मंत्रालयात प्रवेश दिला जातो. करोनाची दुसरी लाट ओसरून शाळा, महाविद्यालये, मंदिरे, मॉल, नाट्यगृहे-चित्रपटगृहे उघडली तरी मंत्रालयातील प्रवेश निर्बंध कायम आहेत.

प्रवेशासाठी कराव्या लागणाऱ्या सोपस्कारांमुळे सर्वसामान्यांबरोबरच मंत्री, त्यांचे खासगी सचिव, कर्मचारी हैराण आहेतच. शिवाय प्रवेशद्वारावर एकाचवेळी प्रवेश करणाऱ्यांची झुंबड उडत असल्याने पोलिसांनाही मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.

मंत्रालयात तात्पुरत्या कामानिमित्त येणाऱ्यांना सध्या ‘गार्डन गेट’ येथूनच प्रवेश दिला जात आहे. कधी कधी या प्रवेशद्वारावर सकाळी ११ ते दुपारी १ च्या सुमारास १०० ते २०० व्यक्तींची झुंबड उडालेली असते. यात सर्वसामान्य नागरिकांपासून कामानिमित्त येणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश असतो. प्रवेशाकरिता सगळ्यांची भिस्त मंत्री कार्यालयातून मिळणाऱ्या शिफारस पत्रावर असते. बरेचदा ही मंडळी मंत्री कार्यालयाशी येनके नप्रकारे संबंध किं वा संपर्कात असलेली असतात. तो नसेल तर प्रवेश मिळविणे सर्वसामान्यांकरिता जिकिरीचे बनते.

मंत्री कार्यालयावरही या प्रक्रि येचा ताण आहे. अनेकदा मंत्र्यांच्या खासगी सचिवांना या कामासाठी कार्यालयात थांबून राहावे लागते. कारण, त्यांच्या सहीच्या पत्राशिवाय प्रवेश दिला जात नाही. कु णी येणार असल्याची वर्दी मिळाली की आधी पत्र तयार करा, मंत्र्याच्या स्वाक्षरीच्या पत्रावर पोलिसांचा सही-शिक्का मिळवा, त्यानंतर हे पत्र प्रवेशद्वारावर घेऊन जा, या कामात मंत्र्यांच्या कार्यालयातील दोन-तीन शिपाई कायम गुंतलेले असतात.

मंगळवार-बुधवारी मंत्रालयात येणाऱ्यांची गर्दी अधिक असते. या दिवशी जवळपास दीड ते दोन हजार व्यक्तींना शिफारस पत्रावर मंत्रालयात प्रवेश दिला जातो, अशी माहिती सूत्रांनी दिली. सर्वसामान्य परिस्थितीतही दीड ते दोन हजार व्यक्तींना मंत्रालयात प्रवेश दिला जातो. इतक्या अभ्यागतांना प्रवेश द्यायचाच असेल तर शिफारस पत्राचे सोपस्कार कशाला, असा प्रशद्ब्रा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ministry access for the common man is still divine akp

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या