चेंबूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चेंबूरमध्ये एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी तीन तरुणांना अटक केली. चेंबूरच्या लालडोंगर परिसरात राहणाऱ्या या मुलीचे विशाल नावाच्या एका तरुणावर प्रेम होते.

१८ जून रोजी ती विशालसह निघून गेली. तब्बल दोन दिवस ही मुलगी बेपत्ता होती. दोन दिवसांनंतर ती घरी परतल्यावर तिच्या नातेवाईकांनी तिची विचारपूस केली. त्या वेळी आपण काही जणांबरोबर फिरायला गेल्याचे त्या मुलीने सांगितले. मात्र खोदून चौकशी केल्यावर आपण विशालसह गेलो होतो, अशी कबुलीही तिने दिली.
या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी चेंबूर पोलीस ठाण्यात विशालच्या विरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी विशाल, सुरज बडवे आणि अविनाश सदाफुले या तिघांना अटक केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Minor girl rape in chembur