scorecardresearch

अल्पसंख्याक विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करावी

डॉ. कदम म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

डॉ. विश्वजित कदम
डॉ. विश्वजीत कदम यांचे निर्देश

मुंबई : शैक्षणिक शुल्क वाढल्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंबंधी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री अल्पसंख्याक व औकाफ राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी बुधवारी दिले.

अल्पसंख्याक विभागाची आढावा बैठक डॉ.कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्यांनी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजना, नागरी क्षेत्र विकासासाठी देण्यात येणारे अनुदान, पोलीस भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण वर्ग, स्वयंसहाय्यता गटासाठी सहायक अनुदान, मुलींसाठी वसतीगृह, मौलाना आझाद मोफत शिकवणी योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये अल्पसंख्यांक तरुणांसाठी अभ्यासक्रम सुरू करणे, अल्पसंख्याक बहुलक्षेत्रात तंत्र निकेतन सुरू करणे, प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रम, उर्दू घर उपक्रम, वक्फ मंडळाच्या योजना आदी विविध योजनांचा आढावा घेतला.

डॉ. कदम म्हणाले की, अल्पसंख्यांक समाजासाठीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी. केंद्र शासनाच्या अल्पसख्यांक समाजातील नागरिकांसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमामधील विविध योजनाचा लाभ राज्यातील जनतेला मिळावा, यासाठी प्रस्ताव पाठवावेत. नांदेड, मालेगाव, सोलापूर येथे उर्दू घर बांधण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मिरज येथेही अल्पसंख्याक समाज मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे तेथेही उर्दू घर बांधण्यासंबंधी प्रस्ताव सादर करावा, असे निर्देशही डॉ.कदम यांनी दिले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Minority students scholarship should increase dr vishwajit kadam zws