scorecardresearch

काकीकडून चिमुकल्या पुतणीला अमानुष मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

मुंबईजवळील मिरारोडमध्ये १५ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या काकीकडून अमानुष मारहण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

मुंबईजवळील मिरारोडमध्ये १५ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या काकीकडून अमानुष मारहण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कॅमेर्‍यात मोबाईल कॅमेर्‍यात कैद झाला आहे. मिरारोडच्या नयानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिरारोडच्या नया नगर परिसरात शेख कुटुंबिय राहतात. तक्रारदारांना १५ महिन्यांची मुलगी आहे. घरात तिचा दिर आणि जाऊ रहाते. चिमुकलीच्या शरिरावर काही दिवसांपासून मारहाणीचे वळ आणि जखमा आढळून येत होत्या. मात्र त्याचा उलगडा अस्मा यांना होत नव्हता. खेळताना ती पडली असेल असे तिला वाटायचे. त्यामुळे तिने घरात मोबाईल कॅमेरा लपवून ठेवला होता. त्यावेळी त्यांची जाऊ मुलीला अमानुष मारहाण करत असतान दिसून आली. याबाबत त्यांनी नयानगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारी नंतर पोलिसांनी आरोपी रेश्मा शेख हिच्या विरोधात बाल न्याय अधिनियमाच्या कलमाअन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी लहान बालिकेला मारहाण करत असल्याची चित्रफित आम्हाला मिळाली आहे. बालिकेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. याप्रकरणी लवकरच दोषारोपत्रतही सादर केले जाईल अशी माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले यांनी दिली.”मी खोलीबाहेर जायची तेव्हा माझ्या मुलीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा दिसायच्या आणि ती रडायची. मला संशय आला होता परंतु पुरावे नव्हते. त्यामुळे मी मुलगी जिथे झोपते तिथे कॅमेरा लपवून ठेवला आणि हा प्रकार समोर आला.”, असे पीडित मुलीची आईने सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-09-2021 at 19:49 IST