जे.जे. रुग्णालयातील बेपत्ता झालेला डॉक्टर योगेश पिरके गोव्यात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा मोबाईल सुरू असून मोबाईलच्या लोकेशनवरून ही माहिती मिळाली आहे.जे.जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टर योगेश पिरके अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. त्यांचा मोबाईलही सुरू असल्याने अनेक तर्क वितर्क लढविले जात होते. बुधवारी त्यांच्या एटीएममधून १० हजार रुपये काढले गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांचा मोबाईलच्या ठावठिकाण्यावरुन ते गोव्यात एका समुद्र किनाऱ्यावजवळ असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांच्या बँक खात्यात ९० हजार रुपये असतांना केवळ १० हजार रुपये काढण्यात आले.  पिरके स्वत:हून गोव्याला गेले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.