बेपत्ता मुलीचा मृतदेह आढळला

मुंब्रा येथील बावळण मार्गाजवळील मकसूदनगरमधील एका खदाणीत शुक्रवारी सायंकाळी एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला असून ही मुलगी १८ जूनपासून बेपत्ता होती.

मुंब्रा येथील बावळण मार्गाजवळील मकसूदनगरमधील एका खदाणीत शुक्रवारी सायंकाळी एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला असून ही मुलगी १८ जूनपासून बेपत्ता होती. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता. या मुलीच्या अंगावर जखमा आढळल्या असून तिचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.तिचा मृत्यू नेमका कसा झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Missing girl dead body found in stone mine