मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला जातीचा रंग दिल्याने संपूर्ण वंजारी समाजाची बदनामी होत आहे. सरपंच हत्याप्रकरण समाजातील वैमनस्यातून घडलेले नसून ते निवडणूक निधीतून घडलेले आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) विधिमंडळ गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

वंजारी म्हणजे बीड जिल्हा नाही. पालघर, यवतमाळ, धुळे, नाशिक, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातही वंजारी आहेत. या समाजातून ५० हून अधिक भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी झाले आहेत. देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील संशयित वाल्मीक कराड हा वंजारी समाजाचा आहे, म्हणुन सर्व समाजालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे योग्य नाही. सगळे वंजारी वाल्मीक कराडच्या पाठिशी नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा…दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करून गोरखपूरला नवी गाडी

या हत्या प्रकरणाला मराठा व वंजारी वादाचा संदर्भ जोडणे चुकीचे आहे. या प्रकरणाशी संबंधित मंडळी समाजाचा संबंध जोडत आहेत. ओबीसी वर्गाला एकत्र येण्याचे आवाहन केले जात आहे. यामुळे हत्या प्रकरणाचे गांभीर्य कमी होत आहे. जातीचे राजकरण करणे दुर्दैवी आहे. अशाने राज्यातील सामाजिक शांतता भंग होईल. देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी सर्वांची अपेक्षा आहे, असे आव्हाड म्हणाले.

Story img Loader