ध्यानधारणेसाठी आमदारांना वेळ मिळेना..

या शिबिराला विधानमंडळ, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी भाग घेत काही काळापुरते का होईना आपले ताणतणाव दूर सारले

मुंबई : योग म्हणजे स्वत:शी साधावयाचा संवाद. पण, जनसंवादातच रस असलेल्या आणि त्यातच गुंतलेल्या लोकप्रतिनिधींकडे स्वसंवाद साधण्याइतकीही फुरसत नसल्याचे चित्र मंगळवारी विधानमंडळात आयोजिण्यात आलेल्या ध्यान योग शिबिरात दिसले.

विधानमंडळात वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी-कर्मचारी कल्याण केंद्र आणि श्री शिवकृपानंद स्वामी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सद्गुरू श्री शिवकृपाशंकर स्वामी यांच्या उपस्थितीत समर्पण ध्यान योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला विधानमंडळ, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी भाग घेत काही काळापुरते का होईना आपले ताणतणाव दूर सारले. परंतु, आमदारांची उपस्थिती तुरळक होती.

‘करोनाच्या संकटामुळे सर्वजण मोठय़ा तणावातून स्वत:च्या अस्तित्वाशी लढत आहेत. या लढाईचा सामना करण्यासाठी योगसाधनेचा उपयोग करावा. या माध्यमातून तणावमुक्त जीवन जगणे संभव आहे,’ असे प्रतिपादन यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी के ले. या शिबिरात विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत, अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

‘जनकल्याणाबरोबरच आत्मकल्याणाचा विचार करावा. स्वत:साठी काहीतरी करण्याची भावना मनात ठेवून रोज किमान ३० मिनिटे ध्यानयोग करावा. कोणत्याही कामाचे नियोजन करून ते पूर्ण करावे आणि नि:स्वार्थ भावनेने कार्य करावे. त्यामुळे स्वत:ला समाधान मिळते. योगध्यान मार्ग हा मनुष्य मनुष्याशी जोडण्यासाठी उत्तम मार्ग आहे. योगाच्या माध्यमातून भेदभाव कमी होतात. ध्यानयोग करताना अंतर्मुख व्हावे. त्यामुळे आत्मविश्वास वाढतो,’ असा सल्ला श्री शिवकृपाशंकर स्वामी यांनी यावेळी दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mla remain absent in meditation yoga camp organized in legislative assembly zws

Next Story
टीएमटी बस बंद पडून वाहतूक ठप्प
ताज्या बातम्या