“त्यांनी माझ्या धर्माबद्दलही…”; झिशान सिद्दिकींची सोनिया गांधींकडे भाई जगतापांविरोधात तक्रार

भाई जगताप यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सिद्दिकी यांनी केली आहे.

मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत कलह आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बांद्रा पश्चिम भागातले काँग्रेस नेते झिशान सिद्दिकींनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रा करणारं एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. १४ नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या एका रॅलीत या दोघांच्यात झालेल्या गोंधळासंदर्भाने हे पत्र लिहिलेलं आहे.

झिशान यांनी पत्रात लिहिलं आहे की, मुंबईत १४ नोव्हेंबर रोजी एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान भाई जगताप यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली. त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. मला धक्काबुक्की केली आणि शेकडोंच्या गर्दीसमोर माझा अपमान केला. त्यावेळी पक्षाची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी मी काही बोललो नाही. पण माझी मागणी आहे भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी. नवभारत टाइम्सने यासंदर्भातलं सविस्तर वृत्त दिलं आहे.

नक्की काय झालं होतं या रॅलीदरम्यान?

काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसने मोदी सरकारविरोधात एका पदयात्रेचं आयोजन केलं होतं. या यात्रेदरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, युथ काँग्रेसचे अध्क्ष झिशान सिद्दिकी आणि युवा नेता सूरज सिंह ठाकूर यांच्यात राजगृहामध्ये जाण्यावरुन खटके उडाले होते. झिशान सिद्दिकी यांनाही आत जायचं होतं, मात्र त्यांना जाऊ दिलं नाही.

यासाठी नंतर स्पष्टीकरण देण्यात आलं की, आत जाण्यासाठी केवळ १० लोकांना परवानगी देण्यात आली होती. म्हणून फक्त ज्येष्ठ नेत्यांनाच आत जाऊ दिलं. तर जिथे वरिष्ठ नेते उभे होते, तिथे उभं राहण्यापासूनही झिशान यांना रोखण्यात आलं. या प्रकारामुळे नाराज होऊन झिशान पदयात्रा अर्धवट सोडून निघून गेले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mla zeeshan siddqui has written a letter to sonia gandhi against mumbai congress president bhai jagtap vsk

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या