मुंबई: न्यायालयीन खर्चाची माहिती देण्यास एमएमआरसीचा नकार

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील विविध न्यायालयीन प्रकरणी किती खर्च झाला त्याची माहिती देण्यास मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) नकार दिला आहे.

mumbai metro
पहिली मेट्रोसदृश लोकल पश्चिम रेल्वेवर (संग्रहित छायाचित्र)

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३ मार्गिकेतील विविध न्यायालयीन प्रकरणी किती खर्च झाला त्याची माहिती देण्यास मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) नकार दिला आहे. माहिती अधिकारांतर्गत हवी असलेली न्यायालयीन खर्चाची माहिती ही ग्राहक आणि वकील यांच्यातील विशेषाधिकार असल्याचे सांगून एमएमआरसीने ही माहिती नाकारली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

हेही वाचा >>>नवनीत राणांचे वडील फरार म्हणून घोषित; मुंबईतील शिवडी न्यायालयाचा दणका

मेट्रो ३ मार्गिकेतील आरे कारशेडला आरेवासीय तसेच पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असून कारशेडचा वाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात गेला आहे. कारशेडसह या मार्गिकेतील वृक्षतोड, ध्वनीप्रदुषणाविरोधातही न्यायालयात वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरसीकडे आरे कारशेडप्रकरणातील न्यायालयीन खर्चाची माहिती मागितली होती. त्यावर मेट्रो ३ च्या विधी खात्याचे सहाय्यक महाव्यवस्थापक यांनी ही माहिती देण्यास नकार दिला आहे.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 18:31 IST
Next Story
मुंबई: घरी न परतलेल्या बारा वर्षांच्या मुलीचा आठ तासांत शोध
Exit mobile version