मुंबई : ‘दहिसर – मिरा – भाईंदर मेट्रो ९’ आणि ‘अंधेरी पूर्व – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो ७ अ’ मार्गिकांची कामे सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून सुरु आहेत. या दोन्ही मार्गिकांच्या कामासाठी कंत्राटदारांना मुदवाढ देण्यात आली आहे. मेट्रो ९ मार्गिकेला जून २०२५ पर्यंत तर मेट्रो ७ अ साठी जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होऊन या मार्गिकांवरुन प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो ९ मार्गिकेचे काम सध्या सुरु असून या मार्गिकेचा उत्तनपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. या मार्गिकेचे आतापर्यंत ९२ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर दहिसर ते गुंदवली, अंधेरी पूर्व मेट्रो ७ मार्गिकेचा गुंदवली, अंधेरी पूर्व ते आंतरराष्ट्रीय विमानतळ असा विस्तार मेट्रो ७ अ मार्गिकेअंतर्गत केला जात आहे. ३.४४२ किमीच्या या मार्गिकेचे सध्या ४६ टक्के स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही मार्गिकांच्या कामासाठीचे कार्यादेश ९ सप्टेंबर २०१९ मध्ये देण्यात आले होते. दरम्यान या मार्गिकांच्या कामासंबंधीची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीएकडे मागितली होती. त्यानुसार या दोन्ही मेट्रो मार्गिकांच्या कामास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली आहे.

international standard business centers in mmr news in marathi
महानगर प्रदेशात आंतरराष्ट्रीय दर्जाची सात व्यापार केंद्रे
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Mogharpada metro car shed
ठाणे : मोघरपाडा येथील १७४ हेक्टर जमीन एमएमआरडीए हस्तांतरणाला मान्यता, मेट्रो कारशेडची होणार उभारणी
Reliance launched the Teerth Yatri Seva initiative at Maha Kumbh
महाकुंभात भाविकांसाठी रिलायन्सची ‘तीर्थयात्री सेवा’
shilphata road update traffic police employees nilaje railway flyover work
शिळफाटा वाहतूक नियोजनासाठी १५० कर्मचाऱ्यांचा ताफा; ५ ते १० फेब्रुवारी शिळफाटा पलावा चौक वाहतुकीसाठी बंद
Navi Mumbai Metro update Belapur Pendhar line Metro speed
नवी मुंबई मेट्रो सुसाट, लवकरच बेलापूर-पेणधर मेट्रोची ताशी ६० प्रति किलोमीटर वेगाने धाव
Metro Line 8 to Link Mumbai and Navi Mumbai Airports
मुंबई विमानतळ ते थेट नवी मुंबई विमानतळ…कशी असेल मेट्रो – ८? खासगी- सार्वजनिक उभारणीचे कोणते फायदे?
maharashtra government guarantee for loan of rs 12000 crore to mmrda
एमएमआरडीएच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अर्थबळ; १२ हजार कोटींच्या कर्जासाठी राज्य सरकारची हमी

हेही वाचा >>>समृद्धी महामार्गावरील बोगद्यांना आकर्षक चित्रांचा साज, ठाणे – नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यावर स्थानिक वारली चित्रकलेचा आविष्कार

मेट्रो ९ च्या कामाचा अंतिम मुदत ८ सप्टेंबर २०२२ अशी होती. मात्र कामास विलंब झाल्याने या कामासाठी कंत्राटदारास जून २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तर मेट्रो ७ अ मार्गिकेची मुदत ८ मार्च २०२३ अशी होती. या कामासही विलंब झाल्याने एमएमआरडीएने या कामाच्या कंत्राटदारासा जुलै २०२६ पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या दोन्ही कामास विलंब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान मेट्रो ९ मार्गिका टप्प्याटप्प्यात सुरु करण्याचे नियोजन एमएमआरडीएचे आहे. अशात या मार्गिकेचे ९२ टक्के काम पूर्ण झाल्याने काम पूर्ण करण्यासाठी बराच काळ लागणार असल्याने या मार्गिकेच्या कामाला पुन्हा मुदतवाढ देण्यात येण्याची शक्यता आहे. तर मेट्रो ९ मार्गिकेतील कारशेडच्या कामास अद्याप सुरुवात झालेली नाही. अशावेळेस या वर्षात वा २०२६ च्या सुरुवातीला या मार्गिकेतील पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करावयाचे झाल्यास एमएमआरडीएकडून मेट्रो ७ च्या कारशेडचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात मेट्रो ९ चा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. पण संपूर्ण मार्गिकेवरुन प्रवास करण्यासाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Story img Loader