मुंबई : मेट्रो, रेल, मोनो रेल, उपगरीय रेल्वे आणि बेस्ट बसमधून एकाच तिकिटावर प्रवास करणे लवकरच मुंबईकरांना शक्य होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणाली (नॅशनल कॉमन मोबिलिटी काड) सुविधेची सुरुवात गुरुवार, १९ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. ही सुविधा तूर्तास ‘मेट्रो २ अ’ (दहिसर ते डीएन नगर) आणि ‘मेट्रो ७’ (दहिसर ते गुंदवली, अंधेरी पूर्व) मार्गिकेसाठी लागू असणार आहे. लवकरच मोनो, रेल्वे आणि बेस्ट प्रवासासाठीही हे कार्ड लागू होणार आहे. त्यासाठीच्या चाचण्या सुरू आहेत.

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था बळकट करतानाच प्रवाशांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ‘एमएमआरडीए’कडून करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टसाठी एकाच कार्डाद्वारे तिकीट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला’ त्यानुसार ‘एकात्मिक तिकीट प्रणाली’अंतर्गत ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी  चाचपणी सुरू होती. आता अखेर ही सुविधा विकसित करण्यात आली आहे.  या कार्डची सुरुवात १९ जानेवारी रोजी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली. भविष्यात मेट्रो, मोनो, रेल्वे आणि बेस्टसाठी एकात्मिक तिकीट प्रणाली सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र तूर्तास ‘मेट्रो २ अ’ आणि ‘मेट्रो ७’साठी ही सुविधा लागू करण्यात येणार आहे.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Big updated for admissions under RTE Online application registration will start
आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी मोठी अपटेड… ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू…
Mumbai Metro Introduces Wristband Ticketing for Metro 1 Route No Need for Paper or Mobile Tickets
‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी आता मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित
Navi Mumbai Municipality Expands Waste Management Scope Introduces waste e Transportation Syste
नवी मुंबई : लवकरच कचऱ्याची ई-वाहतूक सुविधा, कचरा वाहतूक व संकलनासाठी अखेर निविदा प्रसिद्ध

कार्डचा भविष्यात देशभरात उपयोग..

‘मेट्रो १’ (घाटकोपर-वर्सोवा), मोनोरेल (चेंबूर ते जेकब सर्कल), लोकल आणि बेस्टशी हे कार्ड जोडण्यासाठी चाचणी सुरू आहे. त्यामुळे काही महिन्यांत हे ‘कार्ड’ सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी लागू होणार आहे. सध्या एमएमआरडीएने ६० हजार कार्ड तयार केली आहेत. हे कार्ड सर्व मेट्रो स्थानकांवर उपलब्ध करण्यात येतील. १०० ते २००० रुपयांचे रिचार्ज करण्याची सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या कार्डवरून ‘ई पेमेंट’द्वारे तिकीट खरेदी करता येणार आहे. मात्र तिकीट घेतल्यानंतर एका तासात प्रवास करणे आवश्यक असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे भविष्यात हे कार्ड देशभरातील कोणत्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी वापरता येणार आहे.