मुंबई महानगरपालिकेतील सहा नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने झटका दिल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या डॅमेज कंट्रोलच्यादृष्टीने पावले उचलायला सुरूवात केली आहे. त्यानुसार राज लवकरच पुणे, नाशिक आणि कल्याण-डोबिंवली येथील महानगरपालिकांमधील मनसेच्या नगरसेवकांना भेटणार आहेत. या दौऱ्यादरम्यान नगरसेवकांना येणाऱ्या अडचणी आणि प्रश्न राज ऐकून घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुणे, नाशिक आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचे अनुक्रमे ३, ५ आणि १० नगरसेवक आहेत. २००९ च्या तुलनेत या सर्व पालिकांमधील मनसेचे संख्याबळ मोठ्याप्रमाणावर घटले असले तरी या ठिकाणी पक्ष अस्तित्त्वापुरता उरला आहे. त्यामुळे येत्या काळात पक्षाला पुन्हा भरारी घ्यायची असल्यास राज ठाकरे यांना पक्षबांधणीवर अधिक भर देणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पालिकेतील हे नगरसेवक मनसेसाठी महत्त्वाचे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागितले असते तर सात दिले असते; मनसेचा शिवसेनेवर पोस्टर’वार’

भांडुप पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आपला गड मजबूत करण्यासाठी शिवसेनेने मनसेचे सातपैकी सहा नगरसेवक फोडून आपल्या गोटात आणले. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती तुटल्यापासून मुंबई व ठाण्यातून शिवसेना हद्दपार करण्यासाठी भाजपने आटोकाट प्रयत्न केले. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपला यशही मिळाले, मात्र सेनेच्या हातून सत्ता खेचून घेण्याचे स्वप्न पूर्ण न झाल्यामुळे ‘रखवालदारा’ची भूमिका बजाविण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. तेव्हापासून शिवसेनेवर सातत्याने कुरघोडी करण्याचे काम भाजपकडून करण्यात येत होते. भांडुपच्या पोटनिवडणुकीनंतर भाजपच्या नेत्यांनी पालिकेतील सत्ता खेचून आणण्याच्या वल्गना करण्यास सुरुवात केली. त्या पार्श्वभूमीवर मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेत घेऊन भाजपला कात्रजचा घाट दाखवला. मनसेचे नेते व सरचिटणीस गाफिल राहिल्यामुळेच सहा नगरसेवक फुटून मनसेची फसगत झाल्याची संतप्त भावना आता मनसेच्या तळागाळातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली होती. यांच्या पाठीमागे पाच-दहा कार्यकर्ते नाहीत आणि जे सामान्य कार्यकर्त्यांशी संवादही ठेवत नाहीत अशा नेत्यांचीच आता राज ठाकरे यांनी हजेरी घेतली पाहिजे, असेही मत मनसेतून व्यक्त करण्यात आले होते.

शिवसेनेचा ‘लक्ष्यभेदी हल्ला’

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns chief raj thackeray will meet party workers and coorptertre in pune and nashik
First published on: 16-10-2017 at 13:46 IST