मनसेकडून अभिजित पानसे आणि सुरेश म्हात्रे यांना लोकसभेसाठी उमेदवारी

मनसेने ठाणे लोकसभा मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना, तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.

आगामी लोकसभा निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मागील शनिवारी वर्धापनदिनाच्या मुहूर्तावर आपल्या सात शिलेदारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज(शनिवारी) लोकसभा निवडणुकांसाठी आणखी दोन उमेदवार मनसेकडून जाहीर करण्यात आले आहेत. मनसेने ठाणे लोकसभा मतदारसंघातून अभिजीत पानसे यांना, तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या भारतीय चित्रपट सेनेचे माजी अध्यक्ष असणा-या अभिजित पानसेंनी ९ मार्च रोजी झालेल्या मनेसच्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात पक्षप्रवेश केला होता.

कोण आहेत मनसेचे उमेदवार
दक्षिण मुंबई – बाळा नांदगावकर
दक्षिण मध्य मुंबई – आदित्य शिरोडकर
उत्तर पश्चिम मुंबई – महेश मांजरेकर
कल्याण – राजू पाटील
शिरुर – अशोक खंडेपराड
नाशिक – डॉ. प्रदीप पवार
पुणे – दिपक पायगुडे
भिवंडी – सुरेश म्हात्रे
ठाणे- अभिजीत पानसे

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mns decaleres candidate for lokshabha election

ताज्या बातम्या