scorecardresearch

Premium

पालिकेच्या विभाग कार्यालयात उंदीर आणि घुशी सोडणार; मनसेचा इशारा

सात – आठ महिने उलटूनही सांताक्रुझ भागात पाण्याची समस्या कायम आहे.

MNS warned rats mice released municipal department office mumbai
पालिकेच्या विभाग कार्यालयात उंदीर आणि घुशी सोडणार; मनसेचा इशारा (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबई: सांताक्रुझ येथील अनेक भागांमध्ये गेल्या दोन वर्षांपासून दूषित तसेच अपुरा पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयात दोन वेळा मोर्चा काढण्यात आला. मात्र, अद्याप त्यावर पालिकेने तोडगा काढलेला नाही. परिणामी, पालिकेच्या विभाग कार्यालयात दहा हजार उंदीर आणि घुशी सोडण्यात येतील, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कलिना विधानसभा मतदार संघातील वाॅर्ड क्रमांक ८९ विभागातील नागरिकांना सातत्याने दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व नागरिकांनी दोन वेळा पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान या समस्येवर काही दिवसातच तोडगा काढण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने नागरिकांना दिले. मात्र, सात – आठ महिने उलटूनही या भागात पाण्याची समस्या कायम आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी मनसेच्यावतीने पालिकेच्या एच. पूर्व विभाग कार्यालयात दहा हजार उंदीर आणि घुशी सोडण्यात येतील, असे मनसे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले आहे. परिसरातील गावदेवी, मिलिंद नगर, वाघरीवाडा, लालबहादूर शास्रीनगर, सुब्रमण्यमनगर, डिमेलो कंपाऊंड व नवजीवन आदीं परिसरातील नागरिक अपुऱ्या आणि दूषित पाणीपुरवठ्यामुळे हैराण झाले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

water cut Pune
पुण्यात अघोषित पाणीकपातीला सुरुवात : येत्या बुधवारी ‘या’ भागातील पाणी बंद
Pimpri mnc cut trees
धक्कादायक : पिंपरी महापालिका करणार १४२ झाडांची कत्तल, जाणून घ्या काय आहे प्रकरण
illegal dhobi ghat, encroachment, navi mumbai municipal corporation, marathi news,
नवी मुंबई : गटारातील पाण्याने कपडे धुलाई, बेकायदा धोबीघाटाकडे पालिकेचे दुर्लक्ष
Mocking the unemployed
राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून बेरोजगारांची थट्टा, घेतला ‘हा’ निर्णय

यापूर्वी दोन वेळा पालिकेच्या विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पाण्याच्या समस्येची दखल घेऊन तत्काळ त्यावर तोडगा काढला जाईल, असे लेखी स्वरूपात पालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र, सात ते आठ महिने उलटूनही पालिकेने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत, असा आरोप मनसे शाखा अध्यक्ष संतोष उपरलकर यांनी केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns has warned that rats and mice released in the municipal department office mumbai print news dvr

First published on: 06-12-2023 at 14:41 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×