गणपतीसाठी पक्षाचा फलक लावण्यावरून शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर मुंबादेवीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने त्या महिलेला ढकलून देत मारहाण केल्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे. मनसेचे उपविभाग अध्यक्ष विनोद अरगिळे त्यामुळे अडचणीत आले आहेत. मनसेने मात्र झाला प्रकार चुकीचा असला तरी त्या महिलेच्या वर्तनामुळे, तिने घाणेरड्या शिव्या दिल्याने ही घटना घडल्याचे म्हटले आहे.

मुंबादेवी परिसरात गणपतीसाठी मनसेचा फलक लावण्यात येत होता. त्या ठिकाणी प्रकाश देवी यांचे औषधाचे दुकान आहे. त्यासमोर खांब उभारण्यात आला होता. मनसे पदाधिकारी विनोद अरगिळे हे सहकाऱ्यांसह तेथे हजर होते. त्यावेळी प्रकाश देवी यांनी त्यास विरोध केला. ताबडतोब हे सगळे काढून टाका असे त्यांनी सांगितले. त्यावरून विनोद अरगिळे व प्रकाश देवी यांच्यात वाद झाला आणि त्यातून विनोद अरगिळे यांनी त्या महिलेस ढकलून दिले व मारहाण केल्याचे त्या चित्रफितीत दिसत आहे.

pune immoral relationship marathi news
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय
Youth muder in wadi
नागपूर : गांजा पिण्यावरून वाडीत युवकाचा भोसकून खून

व्हिडीओ पाहा :

गणेशोत्सवाच्या वातावरणाला गालबोट

या हाणामारीत ती महिला दोन वेळा खाली पडली. यामुळे गणेशोत्सवाच्या वातावरणाला गालबोट लागले. ही मनसे कार्यकर्त्यांची दादागिरी अशी टीका काही जणांनी समाजमाध्यमांवर केली. तर मनसेचे मुंबादेवी विभाग अध्यक्ष केशव मुळे यांनी मात्र या घटेनेला दुसरी बाजू असल्याचे म्हटले आहे.

“मनसेच्या कार्यकर्त्यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळ”

विनोद अरगिळे यांनी महिलेला धक्काबुक्की करत असल्याची चित्रफीत दाखवली जात आहे. पण या घटनेची पार्श्वभूमी वेगळी आहे. ती महिला पैसे घेऊन फेरीवाल्यांना बसवते. त्यात अडथळा नको म्हणून फलकाचा खांब ती ढकलत होती. तिने मनसेच्या कार्यकर्त्यांना घाणेरड्या भाषेत शिवीगाळही केली. त्यातून हा प्रकार घडला, असे मुळे यांनी स्पष्ट केले आहे.

विनोद अरगिलेंचं म्हणणं काय?

एबीपी माझाशी बोलताना विनोद अरगिले म्हणाले, “ती बाई कोट्यधीश असून रोडवर हप्ता खाते. ती रोज रोडवर धंदे लावते. तिला विभागातील सर्वच नागरिक त्रासले आहेत. आम्ही गणेशभक्तांच्या स्वागतासाठी गेट लावत होतो तेव्हा या बाईने २० फुटांचा वासा ढकलून दिला. तो लाकडी वासा कुणाच्या अंगावर पडला असता तर अनेकजण जखमी झाले असते. हे राज ठाकरेच्या घरी लावा असं ही बाई म्हणाली. तसेच माझ्या अंगावर आली.”

“आम्ही पोलिसांना माहिती दिली, त्याचं रेकॉर्डिंग आहे”

“मी एवढ्या वर्षांपासून येथे काम करतो. या व्हिडीओत केवळ एक बाजू दाखवली आहे. ती बाई आमच्या अंगावर येते. हवंतर आजूबाजूच्या दुकानदारांना विचारा. त्या बाईने येऊन थेट तो गेटचा वासा ढकलला. तसेच आम्हाला शिवीगाळ केली. याबाबत आम्ही पोलिसांना फोन करून माहिती दिली आहे. त्याचं आमच्याकडे रेकॉर्डिंग देखील आहे. याआधीही आम्ही या बाईविरोधात तक्रार केली आहे,” असं विनोद अरगिलेंनी सांगितलं.

हेही वाचा : “‘लाव रे तो व्हिडीओ’वाले राज ठाकरे खरे होते, आता मात्र…”, काँग्रेसची टीका

“आम्ही हातगाड्यांविरोधात आहोत म्हणून हे षडयंत्र”

“या महिलेने थेट माझी कॉलर पकडली, मग आम्ही बचावासाठी काहीच करायचं नाही का? महिलांचा आदर, सन्मान केला पाहिजे हे ठिकच आहे. त्याबद्दल कोणतीही शंका नाही. मात्र, महिलांनीही पुरुषांचा आदर, सन्मान राखला पाहिजे. आम्ही हातगाड्यांविरोधात आहोत म्हणून हे षडयंत्र रचलं जात आहे. त्याविरोधात आम्ही तक्रार दाखल केली आहे. न्यायालयातही खटला दाखल आहे,” असाही आरोप अरगिलेंनी केला.