भेसळयुक्त खाद्यपदार्थ किंवा इतर कोणत्याही बाबींवर FSSAI ची बारीक नजर असते. मात्र, तरीदेखील हे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचं अनेकदा उघड झालं आहे. या प्रकारातून लोकांच्या जीवाशी खेळ करण्याचा भयंकर प्रकार हे भेसळ करणारे व्यावसायिक करत असतात. असाच एक प्रकार मनसेनं नालासोपाऱ्यामध्ये उघड केला असून सर्रासपणे खाद्यतेलामध्ये भेसळ केली जात असल्याचं या ठिकाणी दिसून आलं. या गोदामामध्ये मनसे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी संध्याकाळी धाड टाकली. यावेळी गोदाम मालकाला मनसे स्टाईलने ‘शासन’ करण्यात आल्याचा व्हिडीओ अविनाश जाधव यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नालासोपारा फाट्यावर गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे खाद्यतेलांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी येत होत्या. हे खाद्यतेल वसई-विरार परिसरामध्ये वेफर्स, फरसाण बनवणाऱ्या उद्योजकांना विकलं जात होतं. त्यामुळे आपण खात असलेल्या वेफर्स-फरसाणसाठी भेसळयुक्त तेल वापरलं जात असल्याची शक्यता देखील मनसेनं केलेल्या या भांडाफोडीमधून समोर आली आहे.

“हा भयानक प्रकार आहे. या कंपनीत तेल पॅकिंग होतं. पण इथल्या एकाच मशीनमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचं पामतेल, सनफ्लॉवर तेल आणि झिरो कोलेस्टेरॉल तेल पॅक केलं जात आहे. अशा लोकांवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी अविनाश जाधव यांनी यावेळी केली.

More Stories onमनसेMNS
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns raid on edible oil mixture godown video viral on social media pmw
First published on: 01-12-2021 at 11:02 IST