scorecardresearch

VIDEO: …अन् राज ठाकरेंनी शिवाजी पार्क मैदानात पहिलं भाषण केलं; जाणून घ्या रंजक किस्सा

बाळासाहेब आणि शिवाजी पार्क मैदान; राज ठाकरे यांनी केलेल्या पहिल्या भाषणाचा किस्सा खूपच भावनिक आहे

शिवाजी पार्क मैदान आणि ठाकरे कुटुंब हे नातं फार जुनं. बाळासाहेब ठाकरे, उद्धव आणि राज, आता आदित्य ठाकरे… या सर्व ठाकरेंची भाषणं या शिवाजी पार्क मैदानावर अधिक फुलतात. शिवसेनेच्या पहिल्या सभेपासून ते प्रत्येक दसरा मेळावा बाळासाहेबांच्या भाषणाने दणाणून जायचा. बाळासाहेबांचं या मैदानाशी एक भावनिक नातं होतं. तसंच आता या मैदानशी हे नातं उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंचं आहे. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना याच मैदानात जोरदार भाषणाने केली होती. राज ठाकरे यांचं ते भाषण आजही लोकांच्या स्मरणात आहे. मात्र याच मैदानात राज ठाकरे यांनी केलेल्या पहिल्या भाषणाचा किस्सा खूपच भावनिक आहे.

१९९२ साली संपूर्ण शिवतीर्थ भरलं होतं.बाळासाहेबांच्या शेजारीच राज ठाकरे बसले होते. याप्रसंगी व्यासपीठावर अनेक नेतेमंडळी सुद्धा हजर होते. अचानक बाळासाहेब राज ठाकरेंना म्हणाले , तू बोलणार आहेस ना. त्यावेळी नाही म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभेत पाहिलं भाषण केलं आणि मैदान गाजवलंसुद्धा.

राज ठाकरेंनी हा किस्सा एकदा आठवणीने सांगितला होता.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns raj thackeray first speech in shivaji park dadar sgy

ताज्या बातम्या