राज ठाकरेंचा लाडका श्वान ‘जेम्स’चं निधन, अखेरचा निरोप देताना झाले भावूक

परळच्या स्मशानभूमीत जेम्सवर पार पडले अंत्यसंस्कार

MNS, Raj Thackeray, James, Raj Thackeray Dog Funeral,
राज ठाकरेंचा लाडका श्वान जेम्सचं निधन

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वांनाच माहिती आहे. अनेकदा फोटोंच्या माध्यमातून त्यांचं हे श्वानप्रेम सर्वांसमोर आलं आहे. दरम्यान राज ठाकरे यांचा लाडका श्वान ‘जेम्स’ याचं निधन झाल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राज ठाकरे यांनी आपल्या लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप दिला असून यावेळी ते भावूक झाल्याचं पहायला मिळालं. राज ठाकरे यांच्यासोबत यावेळी कुटुंबीय तसंच पक्षातील नेते आणि समर्थक उपस्थित होते.

राज ठाकरे यांचा श्वान ‘जेम्स’चं सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास निधन झालं. जेम्स गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरेंसोबत होता. वयोमानानुसार त्याचं निधन झालं असून परळमधील स्मशानभूमीत त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आपल्या लाडक्या जेम्सला अखेरचा निरोप देण्यासाठी राज ठाकरे स्वत: उपस्थित होते. यावेळी जेम्सचं अखेरचं दर्शन घेताना राज ठाकरे भावूक झाल्याचं दिसत होतं.

राज ठाकरे आणि ‘जेम्स’ यांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधून राज ठाकरेंना जेम्सचा किती लळा होता हे दिसतं. त्यामुळे आपल्या लाडक्या जेम्सच्या जाण्याने राज ठाकरे भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

राज ठाकरे यांच्याकडे एकूण तीन ग्रेट डेन होते. त्यापैकी बॉण्ड आणि शॉन आधी गेले. त्यानंतर आता जेम्सचं निधन झालं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mns raj thackeray gets emotional after death of james sgy

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या