Premium

मनसेचा ‘त्या’ जाहिरातीवर आक्षेप; “मुंबईत गुजराती भाषेची जबरदस्ती सहन करणार नाही” म्हणत दिला इशारा!

“मराठी आमची राज्यभाषा आहे. त्यामुळे जर नुकसान टाळायचं असेल, तर कंपनीनं ही जाहिरात ताबडतोब थांबवावी आणि माफी मागावी. नाहीतर…”

raj thackeray mns airtel india ad campaign
मनसेचा 'त्या' जाहिरातीवर आक्षेप (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मुंबईच्या मुलुंड वेस्ट भागात एका गुजराती सोसायटीमध्ये मराठी महिलेला कार्यालयासाठी जागा नाकारण्याचा प्रकार ताजा असतानाच आता मनसेनं आणखी एक मुद्दा उपस्थित केला आहे. या मराठी महिलेनं आपली व्यथा सोशल मीडियावर मांडल्यानंतर मनसेनं त्याची दखल घेऊन संबंधित सोसायटीचे सेक्रेटरी व त्यांच्या वडिलांना जाब विचारला. यानंतर त्यांनी सदर महिलेची माफीही मागितली. मुंबईतील मराठीजनांचा हा मुद्दा चर्चेत असतानाच आता एका जाहिरातीवर मनसेनकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“हे सहन करणार नाही”

मनसे नेते अखिल चित्रे यांनी बुधवारी सकाळी एक्सवर (ट्विटर) केलं असून त्यात संबंधित जाहिरातीच्या फेसबुक पेजची लिंकही त्यांनी दिली आहे. या जाहिरातीमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवर त्यांनी आक्षेप घेतला आहे. “गुजराती भाषेची मुंबईत चाललेली सक्ती आम्ही सहन करणार नाही. जर एअरटेलला असं वाटत असेल की मुंबई ही गुजरातीबहुल आहे, तर त्यांनी त्यांची माहिती आधी तपासून पाहायला हवी. मराठी आमची राज्यभाषा आहे. त्यामुळे जर नुकसान टाळायचं असेल, तर कंपनीनं ही जाहिरात ताबडतोब थांबवावी आणि माफी मागावी. नाहीतर नुकसान सहन करण्याची तयारी ठेवावी. कारण इथे एअरटेलचे बहुतेक ग्राहक हे मराठी आहेत”, असा इशाराच अखिल चित्रे यांनी या पोस्टमध्ये दिला आहे.

काय आहे जाहिरातीमध्ये?

या जाहिरातीमध्ये एक नोकरदार महिला एका हॉटेलमध्ये बसून आपल्या मोबाईल नेटवर्कच्या अनुभवावर बोलत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मूळ शूटिंगमध्ये या महिलेची वेगळी भाषा असून त्यावर गुजराती भाषेत डबिंग करण्यात आल्याचं दिसत आहे. आधी अडचणी आल्यानंतर आपण कंपनी बदलली आणि आता अनुभव चांगला आहे असे संवाद या महिलेच्या तोंडी आहेत. मात्र, हे संवाद गुजरातीमध्ये असल्यामुळे त्यावर मनसेनं आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, मनसेच्या अधिकृत एक्स हँडलवर यासंदर्भात पोस्ट करण्यात आली आहे. “हे मुद्दामहून सुरु आहे का? महाराष्ट्रात मराठी राजभाषेला प्राधान्य द्यावं हे माहित असूनही कोट्यवधींच्या जाहिरातीमध्ये मराठीला डावलण्याचा खोडसाळपणा का केला जातो? स्वतः दिल्लीच्या सिंहासनावर बसायचं आणि मराठी माणसाला भाषिक, जातीय अस्मितेसाठी कायम लढवत ठेवायचं असा मनसुबा आहे का?” असा सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns warns airtel india for gujarati ad in mumbai circle pmw

First published on: 04-10-2023 at 13:39 IST
Next Story
खासगी इमारतींच्या पुनर्विकासातील विरोधकांना तूर्तास अभय!