मुंबई : दोन लसमात्रा घेतलेल्या व १४ दिवस उलटून गेलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने नुकतेच यूटीएस मोबाइल तिकीट अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपला प्रतिसाद वाढत आहे. खिडक्यांसमोरील भल्यामोठय़ा रांगेत उभे राहण्यापेक्षा मोबाइल अ‍ॅपच बरे, असे प्रवासी म्हणू लागले आहेत.

मोबाइल अ‍ॅप तिकीट सुविधा २४ नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली. याला चांगला प्रतिसाद आहे. मात्र तिकीट किंवा पास काढताना प्रवाशांना काही तांत्रिक बिघाडांना सामोरे जावे लागत आहे. त्यात सुधारणा केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.