सोमवारी पहाटे गोरेगावजवळ धावत्या लोकलमध्ये एका मोबाइल चोराने प्रवाशावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. या जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले तर सहप्रवाशांनी चोराला पोलिसांच्या ताब्यात दिले. विरार लोकल गोरेगाव स्थानकात शिरत असताना राजू वाजुद्दिन जलालुद्दिन शेख हा तरुण मोबाइलवर गेम खेळत होता. या वेळी दीपक कनोजिया याने राजूच्या हातातून मोबाइल हिसकावून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. राजू याने त्याला प्रतिकार केला असता दीपकने राजूवर हल्ला केला. त्यानंतर सहप्रवाशांनी पुढे येत दीपक आणि त्याच्या साथीदाराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
संग्रहित लेख, दिनांक 30th Jul 2014 रोजी प्रकाशित
लोकलमध्ये मोबाइल चोराचा हल्ला
सोमवारी पहाटे गोरेगावजवळ धावत्या लोकलमध्ये एका मोबाइल चोराने प्रवाशावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली.
Written by admin
First published on: 30-07-2014 at 02:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mobile theft attack in local train in mumbai
