scorecardresearch

‘बेस्ट’ देयक भरणासाठी आता मोबाइल व्हॅन

वीज ग्राहकांना वीजदेयके सुलभरितीने भरता यावीत यासाठी फिरते देयक भरणा केंद्र (मोबाईल व्हॅन) ७ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.

मुंबई: वीज ग्राहकांना वीजदेयके सुलभरितीने भरता यावीत यासाठी फिरते देयक भरणा केंद्र (मोबाईल व्हॅन) ७ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.
वीज देयकांव्यतिरिक्त पाणी, मालमत्ता आणि इतर महापालिका सेवा कर, गॅस, डीटीएच, क्रेडिट कार्ड, शैक्षणिक शुल्क, फास्टॅग रिचार्ज, सदस्यता शुल्क, दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी यांच्या देयकेही येथे भरता येतील. ब्रॉडबँड सेवांचे प्रदान, बेस्टच्या किऑस्क आणि इतर देयकांचे प्रदान करण्याकरीता फिरते कर भरणा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे केंद्र मुंबईतील विविध भागात जाईल. त्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या सेवेचा लोकार्पण सोहळा ७ एप्रिलला कुलाबा येथील बेस्टच्या मुख्यालयात होणार आहे. पहिल्या दिवशी वरळीला प्रेमनगर भागात हे केंद्र उभे राहणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mobile van best payment pay electricity bills electricity consumers amy

ताज्या बातम्या