scorecardresearch

Premium

मुंबई : वंदे भारतमधील प्रवाशांनी घेतला मोदकाचा आस्वाद

मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या चार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सवानिमित्त इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम काॅर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडून प्रवाशांना मोदक देण्यात आले.

modak Vande Bharat train passengers
मुंबई : वंदे भारतमधील प्रवाशांनी घेतला मोदकाचा आस्वाद (संग्रहित छायाचित्र)

मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या चार वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सवानिमित्त इंडियन रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम काॅर्पोरेशन (आयआरसीटीसी) कडून प्रवाशांना मोदक देण्यात आले. यावेळी वंदे भारतमधील सुमारे दोन हजार प्रवाशांनी मोदकांचा आस्वाद घेतला.

मध्य रेल्वेवरून सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-मडगाव आणि पश्चिम रेल्वेवरून मुंबई सेंट्रल-गांधीधाम या चार वंदे भारतमध्ये नियोजित जेवणात मोदक देखील ठेवले होते. गणेशोत्सव काळात प्रवाशांना मोदक देऊन, वंदे भारतमध्ये गणेशोत्सव साजरा केला.

train cancelled without mega block
मुंबई: मेगाब्लॉक नसूनही लोकल रद्द
special train on Mumbai to Nagpur route
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! या मार्गावर दोन दिवस धावणार विशेष गाडी
there is no mega block on central railway on sunday
Mumbai local: मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक नाही
baby born wardha railway station
धावत्या रेल्वेगाडीत प्रसूतीकळा, अखेर स्थानकावर बाळाचा जन्म

हेही वाचा – मुंबई : महानगरपालिकेच्या अमृत कलश यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हेही वाचा – मुंबई : अनंत चतुर्दशीच्या दिवशी मध्य रेल्वेवर विशेष लोकल धावणार

आयआरसीटीसीने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक २०९०१ मुंबई सेंट्रल-गांधीनगरमधील ७०५ प्रवासी, गाडी क्रमांक २२२२३ सीएसएमटी-शिर्डीमधील ७९६ प्रवासी, गाडी क्रमांक २२२३० सीएसएमटी मडगाव ३०५ प्रवासी, गाडी क्रमांक २२२२५ सीएसएमटी-सोलापूरमधील १०१ प्रवाशांना अशा एकूण १,९०७ प्रवाशांना मोदक देण्यात आले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Modak given to vande bharat train passengers mumbai print news ssb

First published on: 26-09-2023 at 23:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×